जॅरेड पोलिस
जॅरेड पोलिस | |
कॉलोराडो राज्याचा ४३वा राज्यपाल | |
विद्यमान | |
पदग्रहण ३ जानेवारी, २०१९ | |
मागील | जॉन हिकेनलूपर |
---|---|
जन्म | ५ डिसेंबर, १९७५ बोल्डर, कॉलोराडो, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | डेमोक्रॅटिक पक्ष |
आई | सुझन पोलिस शुत्झ |
वडील | स्टीवन शुत्झ |
पती | मॅरियन रैस |
गुरुकुल | प्रिन्सटन विद्यापीठ |
व्यवसाय | उद्योजक |
जॅरेड शुत्झ पोलिस (१२ मे, १९७५:बोल्डर, कॉलोराडो, अमेरिका - ) हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याचे ४३वे गव्हर्नर आहेत. हे जानेवारी २०१९पासून या पदावर आहेत.
गव्हर्नरपदावर येण्याआधी पोलिस कॉलोराडोच्या २ऱ्या मतदारसंघातून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात पाचवेळा निवडून गेले.
राजकारणात येण्याआधी पोलिस यांनी अनेक उद्योगसंस्था चालविल्या.
पोलिस हे समलिंगी असून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील असे पहिले व्यक्ती तसेच कॉलोराडोचे पहिले असे गव्हर्नर आहेत. कॉलोराडोच्या गव्हर्नरांपैकी हे पहिले ज्यू धर्मीय आहेत.