जून ८
जून ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५९ वा किंवा लीप वर्षात १६० वा दिवस असतो.
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ठळक घटना आणि घडामोडी
पहिले शतक
- ६८ - रोमन सेनेटने गॅल्बाची रोमन सम्राटपदी निवड केली.
सहावे शतक
- ५३६ - संत सिल्व्हेरियस पोपपदी.
सातवे शतक
- ७९३ - इंग्लंडवरील व्हाइकिंग टोळ्यांच्या हल्ल्यांची पहिली नोंद.
सतरावे शतक
- १६२४ - पेरूमध्ये भूकंप.
अठरावे शतक
- १७८३ - आइसलॅंडमधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक. ९,००० ठार, पुढील ७ वर्षे दुष्काळ.
- १७८९ - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसनने नागरिकांच्या हक्कनाम्याचा मसुदा अमेरिकन संसदेत माडला.
एकोणिसावे शतक
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - टेनेसी अमेरिकेपासून विभक्त झाले.
- १८६६ - कॅनडाच्या संसदेची ओटावामध्ये पहिली बैठक.
- १८८७ - हर्मन हॉलेरिथला पंच कार्ड कॅल्क्युलेटर साठी पेटंट प्रदान.
विसावे शतक
- १९४१ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी सिरीया व लॅबेनॉन वर आक्रमण केले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानच्या पाणबुड्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी व न्यूकॅसल शहरांवर बॉम्बफेक केली.
- १९४८ - जॉर्ज ओरवेलची नाइन्टीन एटी फोर(१९८४) ही कादंबरी प्रसिद्ध झाली.
- १९५३ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हॉटेलांतून श्यामवर्णीय गिऱ्हाईकांना सेवा नाकारणे बेकायदा ठरवले.
- १९६७ - सहा दिवसांचे युद्ध - इस्रायेलच्या लढाउ विमानांनी चकुन अमेरिकेची युद्धनौका यु.एस.एस. लिबर्टी वर हल्ला केला. ३४ ठार, १७१ जखमी.
- १९६८ - मार्टिन ल्युथर किंगच्या खुनाबद्दल जेम्स अर्ल रेला अटक.
- १९८६ - कर्ट वाल्धेम ऑस्ट्रियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
एकविसावे शतक
- २००६ - इराकमधील अल कायदाचा म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी विमानहल्ल्यात ठार.
जन्म
- १९१० - दिनकर केशव बेडेकर, मराठी तत्त्वचिंतक, समीक्षक.
- १९१७ - गजाननराव वाटवे, भावगीत गायक आणि संगीतकार.
- १९२१ - सुहार्तो, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२५ - बार्बरा बुश, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशची पत्नी व जॉर्ज डब्ल्यु. बुशची आई.
- १९३२ - सैयद नझीर अली, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३२ - रे इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३५ - डेरेक अंडरवूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३६ - केनीथ गेडीज विल्सन,अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९७६ - लिंडसे डॅव्हेनपोर्ट, अमेरिकेची टेनिस खेळाडू.
- १९८३ - किम क्लाइस्टर्स, बेल्जियमची टेनिस खेळाडू.
- १९८३ - नादिया पेट्रोव्हा, रशियाची टेनिस खेळाडू.
मृत्यू
- ६२ - क्लॉडिया ऑक्टाव्हिया, रोमन सम्राट नीरोची पत्नी.
- २१८ - मॅक्रिनस, रोमन सम्राट.
- ६३२ - मोहंमद पैगंबर, इस्लामचे संस्थापक.
- १०४२ - हार्थाकॅन्युट, इंग्लंडचा राजा.
- १५०५ - होंग-सी, चीनी सम्राट.
- १७९५ - लुई सतरावा, फ्रांसचा राजा.
- १८४५ - अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचा सातवा राष्ट्राध्यक्ष.
- १९२४ - जॉर्ज मॅलोरी, इंग्लिश गिर्यारोहक.
- १९२४ - अँड्रु अर्व्हाइन, इंग्लिश गिर्यारोहक.
- १९९८ - सानी अबाचा, नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक समुद्र दिन.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जून ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)