जून ५
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५६ वा किंवा लीप वर्षात १५७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पहिले शतक
- ७० - रोमन सेनापती टायटसच्या सैन्याने जेरुसलेमची फळी फोडली व शहरात घुसले.
चौदावे शतक
- १३०५ - क्लेमेंट पाचवा पोपपदी.
एकोणिसावे शतक
- १८३२ - पॅरिसमध्ये विद्यार्थ्यांचा उठाव.
- १८४९ - डेन्मार्कने नवीन संविधान अंगिकारले व संवैधानिक राजेशाही कायम केली.
- १८६४ - अमेरिकन यादवी युद्ध-पीडमॉंटची लढाई - दक्षिणेचा पराभव.
विसावे शतक
- १९०० - दुसरे बोअर युद्ध - ब्रिटिश सैन्याने प्रिटोरिया जिंकले.
- १९०७ - स्वामीनारायण पंथाची स्थापना.
- १९१५ - डेन्मार्कमध्ये स्त्रीयांना मतदानाचा हक्क.
- १९१७ - पहिले महायुद्ध - अमेरिकेत सक्तीची सैन्यभरती सुरू.
- १९२४ - अर्न्स्ट अलेक्झांडरसनने पहिला फॅक्स संदेश स्वतःच्या वडिलांना पाठवला.
- १९३३ - अमेरिकेने गोल्ड स्टॅन्डर्ड रद्द केले.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने नॉर्मंडीवर तुफान बॉम्बफेक केली.
- १९४६ - शिकागोच्या लासाल हॉटेलमध्ये आग. ६१ ठार.
- १९५९ - सिंगापुरमध्ये सर्वप्रथम सरकारची स्थापना.
- १९७५ - सहा दिवसांच्या युद्धानंतर सुएझ कालवा पुन्हा खुला.
- १९७७ - सेशेल्समध्ये उठाव.
- १९८४ - अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीने मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.
- १९८९ - चीनची राजधानी बिजींगच्या तियेनआनमेन चौकातील चळवळीदरम्यान एका अज्ञात निःशस्त्र व्यक्तीने रणगाड्यासमोर उभे राहून रणगाडा थांबवला. हे छायाचित्र या चळवळीचा मानबिंदू ठरले.
एकविसावे शतक
- २०१३ - चीनच्या जिलिन प्रांतातील मिशाझी गावात असलेल्या कुक्कुटमांस तयार करण्याच्या कारखान्यात आग लागून ११९ कामगार ठार. ६० जखमी.
जन्म
- १७७१ - अर्नेस्ट पहिला, हॅनोव्हरचा राजा.
- १८५० - पॅट गॅरेट, अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील पोलीस अधिकारी.
- १८७८ - पांचो व्हिया, मेक्सिकोचा क्रांतीकारी.
- १८७९ - नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.
- १९०० - डेनिस गॅबॉर, हंगेरीयन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९१२ - एरिक हॉलिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१६ - सिड बार्न्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३९ - ज्यो क्लार्क, कॅनडाचा १६वा पंतप्रधान.
- १९४५ - अंबर रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५० - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.
- १९७४ - मर्व्हिन डिलन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १०१७ - सांजो, जपानी सम्राट.
- १३१६ - लुई दहावा, फ्रांसचा राजा.
- १९१६ - लॉर्ड होरेशियो किचनर, ब्रिटिश फील्ड मार्शल, भारताचा व्हाईसरॉय.
- १९७३ - माधव सदाशिव गोळवलकर, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.
- १९८७ - ग. ह. खरे, भारतीय इतिहासतज्ञ.
- २००४ - रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- २०१६ - एलिनॉर झेलियट, अमेरिकन लेखिका आणि इतिहासकार.
- २०२३ - गुफी पेंटल, हिंदी दूरचित्रवाहिनी व हिंदी चित्रपट अभिनेते
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक पर्यावरण दिन
- संविधान दिन - डेन्मार्क.
- मुक्ती दिन - सेशेल्स.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जून ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)