जून १४
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६५ वा किंवा लीप वर्षात १६६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
- १६४८ - मॅसेच्युसेट्समध्ये मार्गारेट जोन्सला चेटकीण ठरवून फाशी देण्यात आली.
अठरावे शतक
- १७७५ - अमेरिकन क्रांती - खंडीय सेनेची स्थापना.
- १७७७ - अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्सचा आपला ध्वज म्हणून स्वीकार केला.
- १७८९ - केंटकीमध्ये इलायजाह क्रेगने प्रथमतः बर्बन व्हिस्की तयार केली.
एकोणिसावे शतक
- १८०० - नेपोलियन बोनापार्टने मॅरेंगोच्या लढाईत ऑस्ट्रियाला हरवले व इटलीचा प्रदेश जिंकला.
- १८०७ - नेपोलियन बोनापार्टने फ्रीडलॅंडच्या लढाईत रशियाला.
- १८४६ - बेर फ्लॅग क्रांती - गोऱ्या नागरिकांनी सोनोमा, कॅलिफोर्निया येथे मेक्सिको विरुद्ध उठाव सुरू केला.
विसावे शतक
- १९०० - हवाई अमेरिकेचा प्रांत झाला.
- १९०० - राइकस्टॅगने जर्मनीचे आरमार वाढवण्याचे ठरवले.
- १९०७ - नॉर्वेत स्त्रीयांना मतदानाचा अधिकार.
- १९१९ - जॉन ऍल्कॉक व आर्थर व्हिटन विमानातून सेंट जॉन्स, न्यू फाउंडलॅंडमधून न थांबता अटलांटिक महासागर पार करण्यासाठी निघाले.
- १९२६ - ब्राझिल लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.
- १९३८ - सुपरमॅनची चित्रपकथा पहिल्यांदा प्रकाशित.
- १९४० - दुसरे महायुद्ध - पॅरिस जर्मनीच्या हवाली.
- १९४० - दुसरे महायुद्ध - ऑश्वित्झ छळ केंद्रात पोलंडचे ७२८ राजकीय कैदी दाखल.
- १९५२ - अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यु.एस.एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
- १९६२ - ऍना स्लेसर्स आल्बर्ट डिसाल्व्हो उर्फ बॉस्टन स्ट्रॅंग्लरची पहिली शिकार झाली.
- १९६६ - व्हॅटिकन सिटीने लिबोरम प्रोहिबिटम (बंदी घातलेल्या पुस्तकांची यादी) जाहीर करणे बंद केले.
- १९६७ - मरीनर ५ या अंतराळयानाचे शुक्राकडे प्रक्षेपित.
- १९८२ - फॉकलॅंड युद्ध समाप्त.
- १९८५ - हिझबोल्लाहने अथेन्सहून निघालेले टी.डब्ल्यु.ए. फ्लाइट ८४७ या विमानाचे अपहरण केले.
एकविसावे शतक
जन्म
- १९६९ - स्टेफी ग्राफ, जर्मन टेनिस खेळाडू.
- १९२२ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.
मृत्यू
- १९१६ - गोविंद बल्लाळ देवल, मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक.
- १९४६ - जॉन लोगी बेअर्ड, ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक.
- १९८९ - सुहासिनी मुळगावकर, मराठी अभिनेत्री व संस्कृत पंडित.
- २०२० - सुशांत सिंह राजपूत, अभिनेता (आत्महत्या)
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जून १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)