जून १३
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६४ वा किंवा लीप वर्षात १६५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५२५ - कॅथोलिक धर्मगुरू व नननी घेतलेले ब्रह्मचर्याचे व्रत मोडून मार्टिन ल्युथर व कॅथेरिना फॉन बोराने लग्न केले.
अठरावे शतक
- १७७७ - अमेरिकन क्रांती - अमेरिकेच्या सैन्याला तालीम देण्यासाठी मार्किस दि लाफियेत दक्षिण कॅरोलिनामध्ये आला.
एकोणिसावे शतक
- १८७१ - कॅनडाच्या लाब्राडोर प्रांतात हरिकेन. ३०० ठार.
- १८८१ - यु.एस.एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.
- १८८६ - कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.
- १८९८ - युकॉन प्रांताची रचना.
विसावे शतक
- १९१७ - पहिले महायुद्ध - जर्मनीच्या गॉथा जी विमानांची लंडनवर बॉम्बफेक. ४६ बालकांसह १६२ ठार, ४३२ जखमी.
- १९३४ - व्हेनिसमध्ये ऍडॉल्फ हिटलर व बेनितो मुसोलिनीची भेट. यानंतर मुसोलिनीने हिटलरचे वर्णन छोटेसे बावळट माकड असे केले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने युद्ध माहिती खाते सुरू केले.
- १९५२ - सोवियेत संघाच्या मिग-१५ विमानाने स्वीडनचे डी.सी. ३ प्रकारचे प्रवासी विमान पाडले.
- १९५६ - पहिली युरोपियन चॅंपियन्स कप स्पर्धा रेआल माद्रिदने जिंकली.
- १९६६ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मिरांडा वि. अॅरिझोना खटल्यात निकाल दिला की पोलिसांनी संशयिताला पकडताना त्याच्या हक्कांची जाणीव करून दिलीच पाहिजे.
- १९७८ - इस्रायेलची लेबेनॉनमधून माघार.
- १९८२ - सौदी अरेबियाच्या राजा खालिदच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ फह्द राजेपदी.
- १९८३ - पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
- १९९४ - अलास्कातील ज्युरीने एक्झॉन व कॅप्टन जोसेफ हेझेलवूडना एक्झॉन वाल्देझ तेल गळती बद्दल दोषी ठरवले व १५ अब्ज डॉलर दंड ठोठावला.
एकविसावे शतक
- २००० - पोप जॉन पॉल दुसऱ्यावर खूनी हल्ला करणाऱ्या महमत अली आग्काला इटलीने माफ केले.
जन्म
मृत्यू
- १९६९ - प्रल्हाद केशव अत्रे, मराठी लेखक, पत्रकार, संपादक, राजकारणी, शिक्षणतज्ञ, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक व प्रभावी वक्ते.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जून १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)