जुलै २६
जुलै २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०७ वा किंवा लीप वर्षात २०८ वा दिवस असतो.
ठळक घटना व घडामोडी
बारावे शतक
- ११३९ - अफोन्सो पहिला पोर्तुगालच्या राजेपदी.
अठरावे शतक
- १७८८ - न्यू यॉर्कने अमेरिकेचे संविधान मान्य केले व त्यायोगे अमेरिकेचे ११वे राज्य झाले.
एकोणिसावे शतक
- १८४७ - लायबेरियाला स्वातंत्र्य.
विसावे शतक
- १९३६ - जर्मनी व इतर मित्र देशांचा स्पॅनिश गृहयुद्धात हस्तक्षेप.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जपानच्या नैऋत्य एशियातील शिरकावास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेतील जपानी मालमत्ता सरकारी ताब्यात घेण्याचा आदेश दिला.
- १९४५ - युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत लेबर पार्टीचा विजय. विन्स्टन चर्चिलने पंतप्रधानपदाचा राजनामा दिला.
- १९४७ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने सी.आय.ए., संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.
- १९४८ - हॅरी ट्रुमनने अमेरिकन सैन्यातील वंशभेद नियमबाह्य ठरवला.
- १९४८ - आंद्रे मरी फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९५३ - क्युबन क्रांतीला सुरुवात.
- १९५३ - अमेरिकेच्या अॅरिझोना राज्यात मोर्मोन पंथाच्या फंडामेंटालिस्ट चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स या बहुपत्नीत्त्व पाळणाऱ्या मूलतत्त्ववादी उपपंथावर कार्रवाई.
- १९५६ - जागतिक बँकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष गमाल नासरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
- १९५७ - ग्वाटेमालाच्या हुकुमशहा कार्लोस कॅस्टियो अर्मासची हत्या.
- १९५८ - अमेरिकेने एक्स्प्लोरर ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- १९६३ - सिनकॉम २ या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
- १९६३ - युगोस्लाव्हियातील स्कोप्ये शहरात भूकंप. १,१०० ठार.
- १९६५ - मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७१ - अमेरिकेच्या अपोलो १५ अंतराळयानाचे प्रक्षेपण.
एकविसावे शतक
- २००५ - मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
- २०११ - मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार.
जन्म
- १८७४ - शाहू महाराज, समाज सुधारक.
- १०३० - संत स्टानिस्लॉ.
- १६७८ - जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १८०२ - मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १८५६ - जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक.
- १८५८ - टॉम गॅरेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७५ - कार्ल युंग, स्विस मनोवैज्ञानिक.
- १९०८ - साल्व्हादोर अलेंदे, [[:वर्ग:चिलेचे राष्ट्राध्यक्ष|चिलेचे राष्ट्राध्यक्ष].
- १९२७ - जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - फ्रांसिस्को कॉसिगा, इटालियन प्रजासत्ताकचा ८वा राष्ट्राध्यक्ष.
- १९२८ - स्टॅन्ली कुब्रिक, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९३९ - जॉन हॉवर्ड, ऑस्ट्रेलियाचा २५वा पंतप्रधान.
- १९४२ - व्लादिमिर मेचियार, स्लोव्हेकियाचा पंतप्रधान.
- १९४३ - मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक.
- १९४९ - थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान.
- १९६९ - जॉॅंटी ऱ्होड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - खालेद महमुद, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ७९६ - ऑफा, मर्शियाचा राजा.
- ८११ - निसेफोरस, बायझेन्टाईन सम्राट.
- १३८० - कोम्यो, जपानी सम्राट.
- १४७१ - पोप पॉल दुसरा.
- १८४३ - सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- १८६७ - ओट्टो, ग्रीसचा राजा.
- १९५२ - एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका.
- २००९ - भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार.
प्रतिवार्षिक पालन
- राष्ट्रीय क्रांती दिन - क्युबा.
- स्वातंत्र्य दिन - लायबेरिया, मालदीव.
- विजय दिन - भारत (कारगिल युद्धाची समाप्ती).
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जुलै २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै २३ - जुलै २४ - जुलै २५ - जुलै २६ - जुलै २७ - जुलै २८ - जुलै महिना