जुनी चिनी लिपी
जुनी चिनी चित्रलिपी (नव्या चिनी लिपीत: 正体字; जुन्या चिनी लिपीत: 正體字; फीनयीनमध्ये रोमन लिखाण: zhèngtǐzì; उच्चार: चऽन्ग्-थीऽइ-झ्; अर्थ: जुनी प्रमाणित चिनी चित्रलिपी) ही चिनी भाषा लिहिण्याच्या दोन चित्रलिपींपैकी एक आणि चिनी गटातल्या भाषांची मूळ चित्रलिपी आहे. या लिपीला चिनी भाषांची पारंपरिक लिपी असेही म्हणतात. ही लिपी अजूनही तैवान, हॉंगकॉंग, आणि मकाव या चीनशेजारील भूभागांमध्ये प्रचलित आहे. सिंगापूर आणि मलेशियातले चिनी लोक सोडले तर परदेशांतले अन्य चिनीही हीच लिपी प्रमाणित मानतात.