Jump to content

जीवराज नारायण मेहता

डॉ. जीवराज नारायण मेहता (२९ ऑगस्ट, १८८७:अमरेली, बॉम्बे प्रेसिडेन्सी(मुंबई प्रांत) - ७ नोव्हेंबर, १९७८) हे गुजरातचे पहिले मुख्यमंत्री होते. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. यांचे सासरे मनुभाई मेहता वडोदरा संस्थानाचे दिवाण होते. त्यांनी मुंबईच्या ग्रॅंट वैद्यकीय महाविद्यालयामधून वैद्यकीय शिक्षण घेतले व नंतर जे.जे. रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून काम केले. त्यानंतर मेहता लंडनला उच्च शिक्षणासाठी गेले आणि एफ.आर.सी.एसची पदवी मिळवली.

भारतात परतल्यावर ते महात्मा गांधींचे खाजगी डॉक्टर होते आणि सत्याग्रह केल्यामुळे दोनदा तुरुंगात गेले. ४ सप्टेंबर, १९४८ पासून ते वडोदरा संस्थानाचे दिवाण झाले. मुंबई प्रांताचे ते अर्थमंत्री व उद्योगमंत्री होते. १ मे, १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाल्यावर ते गुजरातचे पहिले मुख्यमंत्री झाले. १९६३मध्ये हे पद सोडल्यावर ते १९६७ पर्यंत भारताचे युनायटेड किंग्डममधील हाय कमिशनर होते.