जिल्हा न्यायालय
आपल्या क्षेत्रातील तंटे सोडवणे, तंट्यात न्यायनिवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात.भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असत. त्याखालोखाल उच्च न्यायालये असतात. त्यात जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय यांचा समावेश होतो. जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला 'जिल्हा न्यायालय' असे म्हणतात. त्यात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश व अन्य काही न्यायाधीश असतात. जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्याची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचे काम जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश करतात. तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येते.