जिरिबाम रेल्वे स्थानक
जिरिबाम भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | जिरिबाम, जिरिबाम जिल्हा |
गुणक | 24°47′39″N 93°5′59″E / 24.79417°N 93.09972°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ३६ मी |
मार्ग | सिलचर-इम्फाळ रेल्वेमार्ग |
फलाट | 3 |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९०३ |
विद्युतीकरण | नाही |
संकेत | JRBM |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | लुमडिंग विभाग, उत्तर पूर्व सीमा रेल्वे |
स्थान | |
जिरिबाम |
जिरिबाम रेल्वे स्थानक हे भारताच्या मणिपूर राज्याच्या जिरिबाम शहरामधील रेल्वे स्थानक आहे. हे मणिपूर राज्यातील सर्वात पहिले रेल्वे स्थानक असून येथून आसामच्या सिलचर रेल्वे स्थानकासाठी पॅसेंजर गाडी धावते. जिरिबाम-इम्फाळ ह्या १११ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरू आहे व २०२३ सालापर्यंत ह्या मार्गावर वाहतूक सुरू होण्याचा अंदाज आहे.