Jump to content

जियोव्हानी पियेरलुईगी दा पालेस्त्रिना

जियोव्हानी पियेरलुईगी दा पालेस्त्रिना
जन्म ३ सप्टेंबर १५२५
पालेस्त्रिना, पापल राज्ये, इटली
मृत्यू २ फेब्रुवारी १५९४
रोम
संगीत प्रकार धार्मिक संगीत

जियोव्हानी पियेरलुईगी दा पालेस्त्रिना (इटालियन: Giovanni Pierluigi da Palestrina; ३ सप्टेंबर १५२५ - २ फेब्रुवारी १५९४) हा रानिसां काळामधील एक इटालियन संगीतकार होता. धार्मिक संगीताचा जनक मानला गेलेल्या पालेस्त्रिनाने चर्चसाठी अनेक रचना तयार केल्या.

रोमजवळील पालेस्त्रिना नावाच्या गावात जन्मलेला जियोव्हानी १५३७ साली रोममध्ये दाखल झाला व येथेच त्याची कारकीर्द घडली. १५५१ साली पालेस्त्रिनाने लिहिलेल्या संगीत प्रार्थनांचे पुस्तक पोप ज्युलियस तिसरा ह्याल इतके आवडले की त्याने पालेस्त्रिनाला बासिलिका ऑफ सेंट पीटरचा प्रमुख संगीतकार नेमले. एखाद्या इटालियन व्यक्तीने असे पुस्तक लिहिण्याची ही पहिलीच वेळ होती. आपल्या करकिर्दीमध्ये पालेस्त्रिनाने शेकडो प्रार्थना व इतर धार्मिक संगीतप्रकारांच्या रचना केल्या.

बाह्य दुवे