Jump to content

जिम थॉर्प

जिम थॉर्प (२८ मार्च, इ.स. १९५३) हा अमेरिकेचा डेकेथ्लॉन आणि पेंटेथ्लॉन खेळाडू होता. अतिशय गरीब आणि अशिक्षित असलेला थॉर्पने अमेरिकेकडून १९१२ साली स्टॉकहोम येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत जागतिक उच्चांकासह डेकॅथ्लॉन आणि पेंटॅथ्लॉनची सुवर्णपदके जिंकली.

पारितोषिके परत घेतली

थॉर्प हा मूळ अमेरिकन होता. जिम थॉर्पचा हा सन्मान बव्हंश दुर्लक्षिला गेला होता. त्यावेळी वंशभेद सर्रास असलेल्या अमेरिकेत गौरवर्णीय अमेरिकन लोकांनी थॉर्पकडे दुर्लक्ष केले. १९०९ आणि १९१० मध्ये थॉर्प एका स्थानिक क्लबकडून पैसे घेऊन बेसबॉल खेळला होता. यामुळे तो धंदेवाईक खेळाडू ठरला. बेसबॉल जरी त्या वेळी ऑलिंपिकशी संलंग्न नव्हता तरीही शंभर टक्के सदस्य गौरवर्णीय असलेल्या अमेरिकन ॲथलेटिक संघटनेनं थोर्पवर नियमभंगाचा आरोप ठेवून त्याने मिळवलेली सर्व पारितोषिके परत घेतली आणि त्याची हेटाळणी केली.

व्यावसायिक खेळाडू म्हणून यश

त्यानंतर मात्र, थॉर्प सरळ सरळ व्यावसायिक खेळाडू म्हणूनच मैदानात उतरला. अनेक खेळातून त्याने अनेकानेक बक्षिसे पटकावली. मान-मरातबही मिळविला. रशियासह अनेक देशांत क्रीडा दौरे केले. तरीही अमेरिकेत त्याची उपेक्षाच झाली

विसाव्या शतकातला सर्वोत्तम खेळाडू

पुढे 1950 साली विसाव्या शतकातील पहिल्या अर्धशतकातला सर्वोत्तम खेळाडू म्हणून अमेरिकेच्या क्रीडा लेखक, क्रीडा पत्रकार यांच्या संयुक्त समितीने थॉर्पची निवड केली. त्यानंतर अमेरिकेभर त्याचे सत्कार झाले.

मरणोत्तर सन्मान

जेव्हा अमेरिकन सामान्य लोकांनी जिम थॉर्पची चहा केल्यावर अमेरिकेच्या ऑलिंपिक समितीने सर्व अन्यायी निर्णय रद्द करून १३ ऑक्‍टोबर १९८२ रोजी थॉर्पने मिळविलेल्या दोन सुवर्णपदकांसह उच्चांकाची आणि अनेक प्रकारांची मानचिन्हे ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षांच्याच हस्ते त्याला त्याच्या कॅलिफोर्नियातील घरी जाऊन दिली. शेकडोंच्या संख्येत थॉर्पप्रेमी त्या वेळी उपस्थित होते; मात्र त्यावेळी थॉर्प यांच्या निधनाला तीस वर्षे होऊन गेली होती.