Jump to content

जिमी शेरगिल

जिमी शेरगिल
जन्मजसजीत सिंग गिल
३ डिसेंबर, १९७० (1970-12-03) (वय: ५३)
गोरखपूर, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रअभिनेता
कारकीर्दीचा काळ १९९६ - चालू

जसजीत सिंग गिल उर्फ जिमी शेरगिल ( ३ डिसेंबर १९७०) हा एक भारतीय अभिनेता आहे. १९९६ सालच्या गुलजार दिग्दर्शित माचिस चित्रपटामधून जिमीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून जिमीने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायक व सह-नायकाच्या भूमिका केल्या आहेत. मोहब्बतें, मेरे यार कि शादी है, हम तुम, लगे रहो मुन्नाभाई, अ वेन्सडे, स्पेशल २६, बुलेट राजा इत्यादी काही चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.

या शिवाय शेरगिलने अनेक पंजाबी चित्रपट आणि युअर ऑनर सारख्या वेबसिरीझमध्येही अभिनय केला आहे.

हा पंजाबी कवयित्री अमृता शेरगिल यांचा नातू आहे.[]

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील जिमी शेरगिल चे पान (इंग्लिश मजकूर)

संदर्भआणि नोंदी

  1. ^ "Amrita Sher-Gil - The Indian Frida Kahlo". The Telegraph India. 31 December 2019 रोजी पाहिले.