जिमी वेल्स
हा लेख जिमी वेल्स नावाचा विकिपीडियाचा सह-संस्थापक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जेम्स वेल्स.
जिमी वेल्स | |
---|---|
जन्म | ७ ऑगस्ट १९६६ |
टोपणनावे | जिंबो |
संकेतस्थळ http://jimmywales.com/ |
जिमी वेल्स (इंग्लिश: Jimmy Wales ;) (ऑगस्ट ७, इ.स. १९६६ - हयात) हे एक अमेरिकन उद्योगपती व विकिपीडियाचे सह-संस्थापक आणि साहाय्यक आहेत.
वेल्स ह्यांचा जन्म अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल ह्या शहरात झाला. त्यांनी वित्तशास्त्रात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. २००१ साली त्यांनी लॅरी सॅंगर ह्यांच्या सोबतीने विकिपीडियाची स्थापना केली.