जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ
जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GVA, आप्रविको: LSGG) हा स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरातील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ४ किमी वायव्येस असलेला हा विमानतळ कॉइंट्रिन विमानतळ या नावानेही ओळखला जातो. या विमानाची हद्द स्वित्झर्लंड-फ्रांस सीमेस लागून आहे आणि या विमानतळास फ्रांसमधूनही प्रवेश आहे.
येथून युरोपमधील सगळ्या मोठ्या शहरांस तसेच उत्तर अमेरिका, मध्यपूर्व आणि चीनमधील प्रमुख शहरांस विमानसेवा आहे. येथे स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स, ईझीजेट स्वित्झर्लंड आणि एतिहाद रिजनल या विमानवाहतूक कंपन्याचे तळ आहेत.