जालिंदरनाथ देवस्थान, रायमोह
जालिंदरनाथ देवस्थान नवनाथ ग्रंथांमध्ये र्शी कानिफनाथांचे गुरू जालिंदरनाथ असल्याचा उल्लेख आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमोह गावापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर येवलवाडी येथे जालिंदरनाथांचे पुरातन मंदिर आहे. तीन वेशींपैकी मुख्य वेशीतून 50 पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरास तीन प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारावर पशु-पक्षी, गणपतीचे शिल्प साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. मंदिर गाभाऱ्यातील दगडी खांबावर नऊ कमानी आहेत. परिसरात विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर आहे. या शेजारीच अग्निकुंड आहे. माघ पौर्णिमा, गुढीपाडवा, हरिनाम सप्ताह, महाशिवरात्री, रंगपंचमी, ऋषिपंचमी आदी सण-उत्सवांना मंदिरात भाविकांची गर्दी असते. औरंगाबाद येथून बीडमार्गे रायमोह 165 किलोमीटरवर, तर पुण्यावरून येणाऱ्या पर्यटकांसाठी पाथर्डीमार्गे रायमोह 220 किलोमीटर अंतरावर आहे. [१]
संदर्भ
- ^ "जालिंदरनाथ देवस्थान".[permanent dead link]