Jump to content

जानेवारी ८


जानेवारी ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८ वा किंवा लीप वर्षात ८ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

तेरावे शतक

  • १२९७ - फ्रांस्वा ग्रिमाल्डीच्या सैन्याने मोनॅको काबीज केले. ग्रिमाल्डी घराणे येथपासून २१व्या शतकापर्यंत मोनॅकोचे शासक होते.

पंधरावे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८३५ - अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.
  • १८८० - सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
  • १८८९ - संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.

विसावे शतक

  • १९०४ - पोप दहावा पायस याने चर्चमध्ये आखूड झगे घालून येण्यास बंदी घातली.
  • १९०८ - बालवीर चळवळीस प्रारंभ
  • १९४० - दुसरे महायुद्धब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
  • १९४७ - जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना.
  • १९५७ - गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात पडून होते.
  • १९७१ - 'स्वतंत्र बांगलादेश जाहीर केल्याच्या गुन्ह्याखाली अटक झालेल्या शेख मुजिबूर रहमान यांची तुरुंगातून मुक्तता.

एकविसावे शतक

  • २००४ - आर.एम.एस. क्वीन मेरी २ या जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जहाजाचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडून नामकरण.
  • २००५ - अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी.
  • २००६ - ग्रीसच्या कायथिरा बेटाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

संदर्भ


बाह्य दुवे



जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - (जानेवारी महिना)