जानेवारी ३
जानेवारी ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३ वा किंवा लीप वर्षात ३ वा दिवस असतो.
- पृथ्वी उपभू स्थितीत(सुर्यापासून लंबवर्तुळाकार भ्रमणामुळे सर्वात कमी अंतर-१४ कोटी ७० लाख कि.मी.)
ठळक घटना आणि घडामोडी
पंधरावे शतक
- १४३१ - जोन ऑफ आर्क बिशप पिएर कॉशोंच्या हाती लागली.
- १४९६ - लिओनार्डो दा विन्चीने उड्डाणयंत्राचा एक असफल प्रयोग केला.
सोळावे शतक
- १५२१ - पोप लिओ दहाव्याने पोपचा फतवा काढून मार्टिन ल्यूथरला वाळीत टाकले.
अठरावे शतक
- १७७७ - प्रिंसटनची लढाई - जॉर्ज वॉशिंग्टनने चार्ल्स कॉर्नवॉलिसचा पराभव केला.
एकोणिसावे शतक
- १८१५ - ऑस्ट्रिया, ब्रिटन व फ्रांसने एक गुप्त तह मंजूर करून रशिया व प्रशिया विरुद्ध संयुक्त फळी उभारली.
- १८२३ - स्टीवन ऑस्टिनने मेक्सिको सरकारकडून टेक्सासमध्ये जमीन मिळविली.
- १८३३ - ब्रिटनने फॉकलंड द्वीपसमूह बळकाविले.
- १८३४ - स्टीवन ऑस्टिनला मेक्सिको सरकारने मेक्सिको सिटीत तुरूंगात टाकले.
- १८५५ - हवाईमध्ये चीनी नागरिकांचे प्रथम आगमन.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - डेलावेरने संयुक्त संस्थानातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला.
- १८६८ - जपानमध्ये शोगन सत्ता संपली. मैजी वंश पुन्हा राज्यकर्ता.
विसावे शतक
- १९२१ - तुर्कस्तानने आर्मेनियाशी संधी केली.
- १९२५ - बेनितो मुसोलिनीने इटलीत हुकुमशाही जाहीर केली.
- १९३१ - महात्मा गांधीनी गोलमेज परिषदेत संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली .
- १९४७ - अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपण करण्यात आले.
- १९५० - पुणेयेथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन.
- १९५२ - स्वतंत्र भारतातपहिल्या राष्ट्रीय निवडणुका.
- १९५७ - हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले विद्युत घटांवर चालणारे पहिले मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
- १९५८ - सर एडमंड हिलरी हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
- १९५९ - अलास्का अमेरिकेचे ४९वे राज्य झाले.
- १९६१ - अमेरिकेने क्युबाशी संबंध तोडले.
- १९६२ - पोप जॉन तेविसाव्याने फिदेल कास्त्रोला वाळीत टाकले.
- १९९० - पनामाच्या मनुएल नोरिगाने अमेरिकी सैन्यासमोर आत्मसमर्पण केले.
- १९९४ - रशियात ईर्खुट्स्क येथून निघालेले एरोफ्लोतचे टी.यू.१५४ प्रकारचे विमान कोसळले. जमिनीवरील एकासह १२५ ठार.
एकविसावे शतक
- २००४ - ईजिप्तच्या फ्लॅश एरलाइन्स फ्लाइट ६०४ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान लाल समुद्रात कोसळले. १४८ ठार.
जन्म
- १०६ - सिसेरो, रोमन राजकारणी.
- ११९६ - त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
- १८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी.
- १८८३ - क्लेमेंट ऍटली, ब्रिटिश पंतप्रधान.
- १८८६ - जॅक झुल्च, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८९२ - जे.आर.आर.टोकियेन, ब्रिटिश लेखक व भाषाशास्त्री, लॉर्ड ऑफ द रिंग्ज या पुस्तकत्रयीचा लेखक.
- १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक.
- १९२१ - चेतन आनंद, हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
- १९२२ - कीरत चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक.
- १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
- १९६९ - मायकेल शुमाकर, फॉर्म्युला १ चालक.
- १९७१ - आमेर नझीर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ७२२ - गेमेई, जपानी सम्राज्ञी.
- १३२२ - फिलिप पाचवा, फ्रांसचा राजा.
- १४३७ - व्हाल्वाची कॅथेरीन, इंग्लंडचा राजा हेन्री पाचवा, इंग्लंड याची पत्नी.
- १५४३ - हुआन रोद्रिगेझ काब्रियो, पोर्तुगालचा शोधक.
- १९६७ - जॅक रूबी, ली हार्वे ऑस्वाल्डचा मारेकरी.
- १९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी.बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन.
- १९८२ - अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता.
- १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक.
- १९९८ - केशव विष्णू बेलसरे,तथा "बाबा" बेलसरे , मराठी तत्त्वज्ञानी,श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य
- २००० - डॉ. सुशीला नायर, स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर.
- २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी.
- २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती.
- २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ.
- २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी.
- २०१३ - एम. एस. गोपालकृष्णन, भारतीय व्हायोलिनवादक.
- २०१५ - सरिता पदकी, मराठी लेखिका.
प्रतिवार्षिक पालन
- ऑक्युपेशन थेरपी दिन
- बालिका दिन (सावित्रीबाई फुले जन्म दिन)
- महिला मुक्तिदिन
- मूलभूत कर्तव्यपालन दिन
- वर्धापनदिन : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, अॅपल.
जानेवारी १ - जानेवारी २ - जानेवारी ३ - जानेवारी ४ - जानेवारी ५ - (जानेवारी महिना)
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जानेवारी ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)