जानेवारी १४
जानेवारी १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४ वा किंवा लीप वर्षात १४ वा दिवस असतो.
भारतात १४ जानेवारी हा दिवस इ.स.१९९६ पासून भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो
ठळक घटना
सोळावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
१७६१ - पानिपतची तिसरी लढाई - मराठे व अहमदशाह अब्दाली मध्ये झालेले भीषण युद्ध. दुसऱ्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलून गेला.
एकोणिसावे शतक
- १८५७ - इंग्लंडच्या राजाने ईस्ट इंडिया कंपनीला भारतात मिळालेली लूट ठेवून घेण्याची मुभा दिली.
विसावे शतक
- १९२३ - विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
- १९४८ - लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
- १९९३ - मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
- १९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहीर.
एकविसावे शतक
- २००० - ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा उर्फ मुरलीधर देविदास आमटे यांना इ.स. १९९९चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्र्पतींच्या हस्ते प्रदान.
- २००४ - जॉर्जियाच्या पाच क्रॉस ध्वजला पाचशे वर्षांनंतर पुन्हा अधिकृत ध्वजाचे स्थान देण्यात आले.
- २००५ - शनीच्या उपग्रह टायटनवर हायगेन्स प्रोब हे अंतराळयान उतरले.
जन्म
- १८८२ - रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र.
- १८९२ - क्रिकेटमहर्षी दिनकर बळवंत देवधर शतायुषी क्रिकेट खेळाडू.
- १८९६ - डॉ. चिंतामणराव देशमुख. , भारताचे अर्थमंत्री. भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर
- १९०५ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री.
- १९०८ - द्वा.भ. कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत.
- १९१९ - सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी, गीतकार
- १९२३ - चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते.
- १९२६ - महाश्वेतादेवी , ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका.
- १९३१ - सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज’, ऊर्दू शायर.
- १९७७ - नारायण कार्तिकेयन, भारतीय फॉर्म्युला कार रेसिंग चालक.
मृत्यू
- ११६३ - लाडिस्लॉस दुसरा, हंगेरीचा राजा.
- १२३५ - संत सावा, सर्बियाचा संत.
- १३०१ - अँड्रू तिसरा, हंगेरीचा राजा.
- १७४२ - एडमंड हॅले, ब्रिटिश अंतरिक्षशास्त्रज्ञ.
- १७४२ - लुईस कॅरोल, इंग्लिश लेखक व गणितज्ञ.
- १७६१ - विश्वासराव पेशवे, पानिपतच्या ३ऱ्या लढाईत मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ पुत्र.
- १७६१ - सदाशिवराव भाऊ, मराठा सेनापती.
- १८६७ - ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र, नव-अभिजात चित्रपरंपरेतील फ्रेंच चित्रकार.
- १९०५ - अर्न्स्ट ऍबी, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०७ - सर जेम्स फर्गसन, ब्रिटिश राजकारणी, मुंबई, दक्षिण ऑस्ट्रेलिया व न्यूझीलॅंडचा गव्हर्नर.
- १९२० - जॉन फ्रांसिस डॉज, अमेरिकन कार उद्योगपती.
- १९३७ - जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक.
- १९५७ - हंफ्री बोगार्ट, अमेरिकन अभिनेता.
- १९७२ - फ्रेडरिक नववा, डेन्मार्कचा राजा.
- १९७६ - तुन अब्दुल रझाक, मलेशियाचा दुसरा पंतप्रधान.
- १९७७ - ॲंथोनी इडन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९८४ - रे क्रॉक, अमेरिकन झटपट-खाद्यपदार्थ उद्योगपती.
- १९९१ - चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त संगीतकार.
- २००१ - बुर्कहार्ड हाइम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- २००१ - फली बिलिमोरिया, भारतीय माहितीपट निर्माते.
- २०१३ - जसुबेन शिल्पी, भारतीयशिल्पकार.
- २०१४ - पं. पुरुषोत्तम वालावलकर, भारतीय हार्मोनियमवादक.
प्रतिवार्षिक पालन
- मकरसंक्रांत, उत्तरायण - भारत
- भूगोल दिन
- आर्मी दिवस
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जानेवारी १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी १२ - जानेवारी १३ - जानेवारी १४ - जानेवारी १५ - जानेवारी १६ - जानेवारी १७ - (जानेवारी महिना)