जाडूबाई जोरात
जाडूबाई जोरात | |
---|---|
उपशीर्षक | संसारही पेलणार, वजनही तोलणार! |
कलाकार | निर्मिती सावंत किशोरी शहाणे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | २१६ |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | * सोम ते शनि दुपारी १ वाजता
|
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | २४ जुलै २०१७ – ३१ मार्च २०१८ |
अधिक माहिती | |
आधी | आम्ही सारे खवय्ये |
नंतर | होम मिनिस्टर |
जाडूबाई जोरात ही झी मराठी वाहिनीवर दुपारी प्रसारित झालेली एक मालिका आहे.
कथानक
वजन हा आपल्या शरीराचा भाग असतो परंतु वजन म्हणजेच पूर्ण शरीर नसतं किंवा ती आपली ओळखही नसते. असं असलं तरी आपल्याकडे एखाद्याची शारीरिक व्याधी, व्यंग किंवा वेगळेपणा हा त्याची ओळख बनतो. म्हणजे कुणाची उंची कमी असेल तर त्याला बुटका, ठेंगणा म्हणणं, कुणाचं वजन जास्त असलं तर जाड्या म्हणणं असे प्रकार आपण करतो. यामध्ये अनेकदा समोरच्याची मस्करी करण्याचा प्रयत्न असतो तर कधी कमी लेखण्याचा पण यामुळे त्या व्यक्तिच्या भावनाही दुखत असतील याचा विचार फार कमी जण करतात.
जाडूबाई जोरात मालिकेची कथा आहे जुईची. मध्यमवर्गीय घरातील एक स्त्री जिची संसार आणि नोकरी सांभाळण्याची तारेवरची कसरत सुरू आहे. जिच्या गरजा, स्वप्न मर्यादीत आहेत आणि स्वभावही साधा आणि सरळ. घरातील इतरांचा विचार करताना स्वतःकडे दुर्लक्ष झालेली अशी ही जुई. म्हणजे अगदी सकाळी उरलेल्या चपात्या किंवा भात रात्रीच्या जेवणात आधी आपल्या ताटात घेणारी. कधी शिळं पाकं खाणारी तर अन्न वाया जाऊ नये म्हणून तेही आपल्या वाट्याला घेणारी. या सवयीमुळेच हे सगळं खाणं अंगाला लागलेली आणि त्यातच वजन वाढलेली जुई. घराचा हा डोलारा सांभाळताना ऑफिसच्या कामाचाही भार उचलणारी आणि तिकडेही सर्वांच्या कामात मदत करणारी. सर्वांसाठी सर्व काही करणं हा तिचा स्वभाव असला तरी तिचा विचार मात्र कुणीच करत नाही. उलट तिच्या वाढलेल्या वजनावरून घरी आणि ऑफिसमध्येही टिंगल उडवली जाते.
दुसरीकडे जुईच्या शेजारीच राहणारी मल्लिका ही तिच्या अगदी विरुद्ध स्वभावाची. स्वतःकडे लक्ष देणारी, फिटनेस जपणारी आणि महत्त्वाकांक्षा असणारी. जुईचं हे मध्यमवर्गीय वागणं आणि ते जगणं तिला अजिबात आवडत नाही आणि तिचा जाडेपणाही तिला खटकतो. हीच मल्लिका जुईला तिच्या वाढलेल्या वजनावरून एकदा सुनावते ज्यामुळे जुईचा अहंकार दुखावला जातो आणि मग ही जाडूबाई एक आगळा वेगळा निर्धार करते. याच जाडूबाईची गोष्ट म्हणजे ही मालिका.
कलाकार
- निर्मिती सावंत :- जुई अण्णा कानविंदे / जुई सूर्यकांत सामंत (जाडूबाई)
- किशोरी शहाणे :- मल्लिका शंतनू राजे / मल्लिका श्रीकर प्रधान
- आनंद काळे :- सूर्यकांत अप्पा सामंत
- विघ्नेश जोशी :- श्रीकर शंकर प्रधान
- संचिता कुलकर्णी :- सायली सूर्यकांत सामंत
- सिद्धार्थ खिरीड :- ऋग्वेद श्रीकर प्रधान
- जयंत सावरकर :- अण्णा कानविंदे
- प्रदीप जोशी :- अप्पा सामंत
- संजीवनी समेळ :- उमा अप्पा सामंत
- पार्थ घाटगे :- यश सूर्यकांत सामंत
- प्रज्ञा जावळे एडके :- नंदा अप्पा सामंत / नंदा समीर नाईक
- अमेय बोरकर :- विराज वसंत बर्वे
- राजेश चिटणीस :- वसंत बर्वे
- योगिता चव्हाण :- गार्गी रणजितसिंग निंबाळकर
- रागिणी सामंत :- रागिणी नाईक
बाह्य दुवे
संध्या. ६च्या मालिका |
---|
होम मिनिस्टर | साडे माडे तीन | कुंकू | जाडूबाई जोरात | महा मिनिस्टर | यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची |