Jump to content

जागतिक मूळव्याध दिन

२० नोव्हेंबर हा जगभर जागतिक मूळव्याध दिन म्हणून साजरा केला जातो. जगात सर्वच देशांमध्ये मूळव्याधीचे रुग्ण आहेत व त्यांची संख्या वाढतेच आहे. या दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी या आजाराविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित होत असतात.

भारतात आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळपूर्वी मूळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मूळव्याध होऊ लागला आहे. मूळव्याधीच्या एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत.