Jump to content

जागतिक बधिरीकरण दिन

विल्यम टी.जी. मॉर्टन

जागतिक बधिरीकरण दिन किंवा जागतिक भूल दिन, ज्याला काही देशांमध्ये राष्ट्रीय भूल दिन किंवा इथर दिवस म्हणूनही ओळखले जाते, हा दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी पाळला जातो. १६ ऑक्टोबर १८४६ रोजी 'विल्यम टी.जी. मॉर्टन' यांनी डाय-एथिल ईथर चा सर्वप्रथम वापर करून वेदनारहित शल्यचिकित्सा करण्यात आपले योगदान दिले. या प्रात्यक्षिकाच्या स्मरणार्थ हा दिवस जगभरात वार्षिक प्रतीपालन दिवस म्हणून साजरा केला जातो.[]

ही वैद्यकशास्त्राच्या इतिहासातील सर्वात लक्षणीय घटनांपैकी एक मानली जाणारी घटना असून 'हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिन'चे घर असलेल्या 'मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या' ऑपरेटिंग थिएटरमध्ये (आता 'इथर डोम' म्हणून ओळखले जाते) घडली. या शोधामुळे रुग्णांवर वेदनारहित शल्यचिकित्सा उपचार करणे शक्य झाले.[]

किमान १९०३ पासून या तारखेच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. वर्ल्ड फेडरेशन ऑफ सोसायटीज ऑफ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट दरवर्षी जागतिक भूल दिन साजरा करते. १५० हून अधिक देशांतील भूलतज्ज्ञांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३४ हून अधिक सोसायट्या सहभागी होतात.[]

संदर्भ

  1. ^ a b Haridas RP (2017). "October 16: Ether Day, National Anaesthesia Day and World Anaesthesia Day". J Anesth Hist. 3 (4): 115–116. doi:10.1016/j.janh.2017.11.001. PMID 29275801.
  2. ^ "National Historic Landmarks Program: Ether Dome, Massachusetts General Hospital". 2011-06-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.