Jump to content

जांभा

जांभा तथा लॅटेराइट (इंग्रजी: laterite) हा एक प्रकारचा खडक आहे. हा सहसा उष्ण आणि ओल्या विषुववृत्तीय प्रदेशांत सापडतो. भारतात जांभा दगड कोकणात आढळून येतो. हा खडक लाल रंगाचा असतो. यात लोह आणि बॉक्साइट खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. हा अतिशय खडबडीत असतो आणि कातळापेक्षा वजनाने हलका असतो. तसेच सच्छिद्र असतो.

भारतातील खाणीतून काढल्यावर खडकापासून त्याचे तुकडे करतात त्याला चिरा म्हणतात. या चिरा बांधकामासाठी वापरतात. कोकणातील घरे या दगडापासून घरे बांधली जातात. हा १४ इंच लांब ९ इच रुंद ७ इंच उंच अशा आकारात साधारणतः वापरला जातो.

कोकणात मिळणारा जांभा दगड
जांभ्या दगडापासून बांधलेले घर