जस्टिन गॅट्लिन
२०१६मध्ये रियो दि जानेरोतील शर्यतीत भाग घेताना गॅट्लिन | |
वैयक्तिक माहिती | |
---|---|
राष्ट्रीयत्व | अमेरिका |
जन्मदिनांक | १० फेब्रुवारी, १९८२ |
जन्मस्थान | ब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका |
उंची | १.८५ मी (६ फूट १ इंच) |
वजन | ७९ किलोग्रॅम (१७० पौंड) |
खेळ | |
देश | अमेरिका |
खेळ | ट्रॅक आणि फिल्ड |
खेळांतर्गत प्रकार | १०० मी, २०० मी |
महाविद्यालयीन/ विद्यापीठीय संघ | टेनेसी विद्यापीठ |
कामगिरी व किताब | |
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी | १०० मी: ९.७४ से (युजीन, २०१५) |
जस्टिन गॅट्लिन (१० फेब्रुवारी, १९८२:ब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हा एक अमेरिकन धावपटू आहे. हा १०० मी आणि २०० मी धावण्याच्या शर्यतींमध्ये भाग घेतो. याने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एक सुवर्ण, दोन रजत आणि दोन कांस्य पदके मिळवली आहेत. याशिवाय त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळाली आहेत.
जमैकाचा युसेन बोल्ट आणि गॅट्लिन हे एकमेकांचे स्पर्धक होते. बोल्ट निवृत्त झाल्यावर गॅटलिनला जगातील सर्वात वेगवान माणूस हा खिताब मिळाला.