Jump to content

जळू

जळू
Silurian–Recent
PreЄ
Є
O
S
D
C
P
T
J
K
Pg
N
हिरुडो मेडिसिनालिस
हिरुडो मेडिसिनालिस
प्रजातींची उपलब्धता

असुरक्षित प्रजाती  (IUCN 3.1)
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: ॲनेलिडा
जात: क्लिटेलाटा
वर्ग: हिरुडिनिया

जळवा या ॲनेलिडा संघातील हिरुडिनिया वर्गातील जीव आहेत. बहुतेक जळवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या आहेत; पण काही समुद्रातील माशांच्या, कूर्मांच्या किंवा क्रस्टेशियन (कवचधारी) प्राण्यांच्या शरीरावर परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) असतात व काही जमिनीवर दमट किंवा दलदलीच्या जागी राहतात. त्यांच्या शरीराच्या पुढच्या आणि मागच्या टोकावर एकेक शोषक (द्रव पदार्थ ओढून घेणारा अवयव) असून त्यांचा उपयोग एखाद्या वस्तूला चिकटण्याकरिता आणि संचलनाकरिता होतो.

आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सा करताना रक्तमोक्षणासाठी काही ठिकाणी जळवांचा उपयोग केला जातो.