जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - १४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील धरणगांव तालुका आणि जळगाव तालुक्यातील कानळदे, असोदा, जळगांव, नाशिराबाद आणि म्हसावद ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
आमदार
वर्ष | आमदार[३] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | गुलाबराव रघुनाथ पाटील | शिवसेना | |
२०१४ | गुलाब रघुनाथ पाटील | शिवसेना | |
२००९ | गुलाबराव बाबुराव देवकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
जळगाव ग्रामीण | ||
उमेदवार | पक्ष | मत |
गुलाबराव बाबूराव देवकर | राष्ट्रवादी | ७१,५५६ |
गुलाब रघुनाथ पाटील | शिवसेना | ६६,९९४ |
ललित विजय कोल्हे | मनसे | १३,५७० |
चंद्रकांत अंकुश बिऱ्हाडे | बसपा | २,५०० |
भगवान भावलाल पाटील | अपक्ष | २,४३१ |
सुरेश कचरू फिरके | राष्ट्रवादी जनता पार्टी | १,८४७ |
अमितकुमार शामराव साळुंखे | लोकसंग्राम पक्ष | १,३४८ |
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
विजयी
- गुलाबराव पाटील - शिवसेना
संदर्भ
- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".