जलसाहित्य संमेलन
जनसाहित्य संमेलन याच्याशी गल्लत करू नका.
अखिल भारतीय जलसाहित्य संमेलन ही भारतीय जल संस्कृती मंडळाने रूढ केलेली एक महत्त्वाची संकल्पना आहे.
आजवरची जलसाहित्य संमेलने
- १ले संमेलन नागपूरमध्ये २००३मध्ये. संमेलनाध्यक्ष - श्री. ना.धों. महानोर. हे संमेलन नागपूरच्या महिला पाणी मंचाच्या सहकार्याने पार पडले.
- २रे पुणे येथे २००५मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स व अभियंता मित्र मासिक यांच्या सहकार्याने पार पडले. श्री. मधु मंगेश कर्णिक या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- ३रे रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथे. संमेलनाध्यक्ष - मंगेश पाडगावकर.
- ४थे जलसाहित्य संमेलन नाशिक येथे १६ व १७ फेब्रुवारी २००८ दरम्यान झाले. हे संमेलन भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या नाशिक शाखेने नाशिक एज्युकेशन सोसायटी व नाशिकचीच गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थांच्या सहयोगाने पार पाडले. संमेलनाध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे होते.
- ५वे जळगाव येथे दिनांक ७ व ८ ऑगस्ट २००९ दरम्यान भारतीय जलसंस्कृती मंडळ आणि जैन इरिगेशन समूह यांच्या सहयोगाने पार पडले. संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ डॉ.माधव गाडगीळ होते.
- ६वे संमेलन चंद्रपूर येथे सन २०१०मध्ये पार पडले. या संमेलनास डॉ. विकास आमटे हे अध्यक्ष म्हणून लाभले होते..
- ७वे सातवे जलसाहित्य संमेलन नांदेड येथे १० आणि ११ डिसेंबर २०११ दरम्यान झाले. हे संमेलन भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या नांदेड शाखेने, नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्र आणि नांदेडच्या गुरू गोविंद सिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय या संस्थांच्या सहयोगाने पार पाडले. संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे होते.
- ८वे कोल्हापूरला १९ व २० जानेवारी २०१३ या तारखांना झाले. हे संमेलन भारतीय जलसंस्कृती मंडळ, कोल्हापूर शाखेच्यावतीने पार पडले. संमेलनाध्यक्षपद प्रसिद्ध साहित्यिक डॉ. चंद्रकुमार नलगे होते..
- ९वे औरंगाबादमध्ये १३-१४ मार्च २०१४ या तारखांना. संमेलनाध्यक्ष - न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर.
- १०वे संमेलन चिपळूण येथे १३, १४ व १५ जानेवारी २०१७ दरम्यान झाले. हे संमेलन भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या चिपळूण शाखेने तेथीलच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या सहयोगाने पार पाडले. संमेलनाध्यक्ष - डॉ. अशोक कुकडे.
- ११वे धुळे येथे २०-२१ जानेवारी २०१८ या तारखांना. अध्यक्ष - जलसंधारण विभागाचे सचिव श्री. डवले.
पहा : साहित्य संमेलने