Jump to content

जलसाक्षरता चळवळ

जलसाक्षरता अभियान अथवा चळवळ ही जनतेस पाण्याचा योग्य तऱ्हेने वापर करण्यास व पाण्याच्या नियोजनास प्रवृत्त करण्याची एक चळवळ आहे. त्याने पाण्याचा दुष्काळ दूर होण्यास मदत होते. ही महाराष्ट्रातील एक स्वयंस्फूर्त चळवळ आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने यशदा, पुणे येथे जलसाक्षरता केंद्राची स्थापना केली आहे.[][]

या चळवळीतील स्वयंसेवकांना जलनायक, जलयोद्धा, जलदूत, जलसेवक,जलकर्मी, जलप्रेमी असे संबोधण्यात येते.[]

या चळवळीचा एक भाग म्हणून जलसाक्षरता संवादयात्रा काढण्यात येते. याद्वारे जलसाक्षर गावांची यशोगाथा इतर गावातील गावकऱ्यांपर्यंत पोचविण्यात येते.

संदर्भ

  1. ^ "यशदाचे विभाग (Department websites)". www.yashada.org. २१ मार्च २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ देशकर, दत्ता. "महाराष्ट्र सरकारतर्फे जलसाक्षरता केंद्राची स्थापना". hindi.indiawaterportal.org. 2019-03-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ मार्च २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ मानकर, संदीप (३ नोव्हेंबर २०१७). "जलसाक्षरतेसाठी नियुक्त्या". लोकमत. २१ मार्च २०१९ रोजी पाहिले.