Jump to content

जलसंधारण

जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकास आणि तिचे उपयुक्ततापूर्ण व फायदेशीर व्यवस्थापन होय. जलसंधारणाची गरज ओळखून जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनी पहिल्यांदाच जलसंधारण विभागाची निर्मिती केली. पृथ्वीच्या पृष्ठाचा ७१ टक्क्यांपेक्षा अधिक भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांमुळे प्राणिजीवन, वनस्पतिजीवन, मानवी जीवन आणि आधुनिक संस्कृती यांत पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली (पर्जन्यधारित) म्हणजेच कोरडवाहू आहे. महाराष्ट्र राज्यात जलसंधारण क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानाबद्दल जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांच्या स्मरणार्थ १० मे रोजी जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. सुधाकरराव नाईक यांनी राज्यात जलसंधारणाची अनेक विधायक धोरण आखली.जलसंधारणाचे स्वतंत्र खाते निर्माण केले. हे देशात पहिलेच खाते मानले जाते. दुष्काळ आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेऊन त्यांची प्रखर अमलबजावणी देखील केली होती. त्यांच्या जलसंधारण विषयक अभ्यास, परिश्रम आणि धोरणाचे आजही विषेशत्वाने उल्लेख केला जातो.

शेतीला अनेक मर्यादा येतात. त्या दूर करण्यासाठी पाणलोट व जलसंवर्धन हा अतिशय चांगला पर्याय आहे. जलसंधारण विभागाअंतर्गत विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. महाराष्ट्रात 'पाणी अडवा पाणी जिरवा' या दूरदर्शी मुलमंत्रावर आधारित जलयुक्त शिवार सारखे अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद अंतर्गत देखील जलसंधारण समिती असते. पावसाचे पाणी बचत करणे आणि उपलब्ध पाण्याचे योग्य संवर्धन करून भूजलातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी निर्णायक पाऊले आखण्याची गरज निर्माण झाली आहे.

संदर्भ

[]
  1. ^ गुल्हाने, प्रा. दिनकर (२०१९). "दुष्काळात आठवतात सुधाकरराव नाईक". पुणे: एग्रोवन सकाळ. 2021-10-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-27 रोजी पाहिले.