जलविद्युत
पाणी जास्त उंचीकडून कमी उंचीकडे वाहते. या वाहण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीजनिर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती असे त्याचे तत्त्व आहे. कारण या प्रकारात स्थितिज ऊर्जा ही गतिज ऊर्जेत बदलते. या तऱ्हेने केलेल्या विद्युतनिर्मितीला जलविद्युत असे म्हणतात.
जलविद्युत प्रकल्प
महाराष्ट्रातील प्रकल्प
महाराष्ट्रात कोयना नगर येथे मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. पावसाळ्यात वाहणारे पाणी एका धरणात साठवले जाते, व नंतर तेच पाणी उन्हाळ्यात वापरले जाते. साधारणतः धरणाच्या उंचीपासून किंवा पाण्याच्या पातळीपासून जनित्रापर्यंतची उंची २५ ते २५०० मीटर इतके असते. भारतात २६९१०.२३ मेगावॅट इतकी विद्युत ऊर्जा जलविद्युत केंद्रांमधून निर्माण होते (इ.स. २०२३चा अंदाज).
या विद्युत प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण उद्भवत नाही, यामुळे या प्रकल्पाचा पर्यावरणास कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही. या विद्युतप्रकल्पाची एक त्रुटी ही आहे, की या प्रकल्पास फार मोठी जागा लागते. तसेच धरणात साठवलेल्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते.