Jump to content

जलरंगचित्रण

ब्रशाने जलरंगांतून चित्र काढणारा चित्रकार

जलरंग (इंग्लिश: Watercolour / Watercolor, वॉटरकलर ; फ्रेंच: Aquarelle, आक्वारेल ;) हे चित्रकलेतील एक रंगमाध्यम आहे. पाण्यात विद्राव्य, अर्थात मिसळण्याजोग्या, असलेल्या रंगांना 'जलरंग' व अश्या चित्रणपद्धतीला जलरंगचित्रण म्हणतात. सहसा कागदाच्या पृष्ठभागावर वापरले जाणारे जलरंग कधीकधी कॅनव्हास, लाकूड, कापड, चामडे, प्लास्टिक अश्या अन्य पृष्ठमाध्यमांवरही वापरले जातात. चीन, जपान, कोरिया इत्यादी पौर्वात्य देशांमध्ये पाण्यात विद्राव्य असणाऱ्या व सहसा काळ्या किंवा ब्राउन रंगांतील शायांचा वापर करून जलरंगचित्रे चितारायची परंपरा आहे. भारतीय उपखंड, इथिओपिया या प्रदेशांतही जलरंगचित्रणाच्या स्थानिक परंपरा आहेत.

बाह्य दुवे