जर्मन वसाहती साम्राज्य
जर्मन साम्राज्याच्या वसाहतींना जर्मन वसाहती साम्राज्य म्हणत. हे साम्राज्य अल्पजिवी होते. १८८४ साली या साम्राज्याचा उदय झाला. परंतु जर्मनीच्या आफ्रिकेतील व पॅसिफिकमधील वसाहती पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच दोस्त राष्ट्रांच्या ताब्यात गेल्या. १० जानेवारी १९२० रोजी व्हर्सायचा तह झाल्यानंतर जर्मन वसाहती साम्राज्याचा अधिकृतपणे अस्त झाला.
वसाहती
आफ्रिका
- जर्मन पूर्व आफ्रिका (Deutsch-Ostafrika): सध्याचा टांझानिया, बुरुंडी, केन्या, मोझांबिक आणि ऱ्वान्डा
- जर्मन दक्षिण-पश्चिम आफ्रिका (Deutsch-Südwestafrika): सध्याचा नामिबिया आणि बोत्स्वाना
- कामेरुन: सध्याचा कामेरुन
- टोगोलॅंड: सध्याचा टोगो
पॅसिफिक
- जर्मन सामोआ: सध्याचा सामोआ
- जर्मन न्यू गिनी: सध्याचे पापुआ न्यू गिनी