Jump to content

जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्ष

जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्ष
Sozialdemokratische Partei Deutschlands
संक्षिप्त नाव SPD
नेता साक्सिया एस्केन
अध्यक्ष केव्हिन क्युहनर्ट
चान्सेलरओलाफ शोल्त्स
स्थापना २७ मे १८७५
मुख्यालयबर्लिन
सदस्य संख्या ४,०४,३०५
राजकीय विस्तार सामाजिक लोकशाहीवाद
रंग
  1. FF0000
बुंडेश्टाग
२०६ / ७३६
बुंडेश्राट
२१ / ६९
युरोपीय संसद
१६ / ९६
www.spd.de

जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्ष (जर्मन: Sozialdemokratische Partei Deutschlands) हा जर्मनी देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. १८६३ साली स्थापना झालेला हा जर्मनीमधील सर्वात जुना पक्ष असून मार्क्सवादी विचारसरणीचा तो जगातील सर्वप्रथम राजकीय पक्ष होता. आजच्या घडीला सामाजिक लोकशाहीवादी पक्ष जर्मन बुंडेश्टागमधील सत्ताधारी पक्ष आहे. ह्या पक्षाचे नेते ओलाफ शोल्त्स जर्मनीचे विद्यमान चान्सेलर आहेत.

१९३० च्या दशकामध्ये नाझी पक्षॲडॉल्फ हिटलर जर्मनीवरील पकड घट्ट करीत असताना सामाजिक लोकशाहीवादी पक्षाने नाझींचा विरोध केला होता. ह्या कारणास्तव १९३३ साली ह्या पक्षावर बंदी घातली गेली व त्याच्या अनेक सदस्यांना तुरूंगात डांबण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर सामाजिक लोकशाहीवादी पक्षाचे कामकाज पुन्हा सुरू झाले. आजच्या घडीला ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन सह सामाजिक लोकशाहीवादी पक्ष जर्मनीमधील प्रमुख पक्ष मानला जातो.

पक्षाचे पदाधिकारी

जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष

नावकार्यकाळ
गुस्टाफ हाइनेमान1969–1974
योहानेस राऊ1999–2004
फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर2017–चालू

जर्मनीचे चान्सेलर

नावकार्यकाळ
विली ब्रांट1969–1974
हेल्मुट श्मिट1974–1982
गेऱ्हार्ड श्र्योडर1998–2005
ओलाफ शोल्त्स2021–

बाह्य दुवे