Jump to content

जय शेट्टी

जय शेट्टी
जन्म ६ सप्टेंबर १९८७
बार्नेट, नॉर्थ लंडन, लंडन, इंग्लंड, युनायटेड किंग्डम
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
प्रशिक्षणसंस्था

क्वीन एलिझाबेथ स्कूल, बार्नेट (व्याकरण शाळा)

कॅस बिझनेस स्कूल, बी. एस्सी ( अर्थशास्त्र )
ख्याती थिंक लाइक अ मॉन्क
कार्यकाळ २०१३- चालू
जोडीदार राधी देवलुकिया
पुरस्कार ११ वा शोर्टी पुरस्कार

जय शेट्टी (जन्म ६ सप्टेंबर १९८७ ) हे एक इंग्रजी लेखक, माजी हिंदू संन्यासी आणि भारतीय वंशाचे जीवन प्रशिक्षक आहेत .[][][][][][][] पॉडकास्ट ऑन पर्पजचे होस्ट म्हणून,त्यांच्या पाहुण्यांमध्ये अॅलिसिया कीज, ख्लो कार्दशियन आणि कोबे ब्रायंट यांचा समावेश आहे, परिणामी या पोडकास्टचे ६४ दशलक्ष डाउनलोड झाले आहेत.[] त्यांनी द एलेन डीजेनेरेस शो,[] अ लिटिल लेट विथ लिली सिंघ [१०] आणि टुडे या कार्यक्रमांमध्ये मानसिक आरोग्य आणि जीवनाच्या उद्देशावर चर्चा करण्यासाठी हजेरी लावली होती .[११][१२]

कारकीर्द

शेट्टी... बिझनेस स्कूलमध्ये, गौरांगा दास या साधूला भेटले, ज्यांना शाळेत निःस्वार्थीपणा आणि किमान जीवनशैली जगण्यावर बोलण्यासाठी आमंत्रित केले होते.[] त्यांच्या भाषणानंतर शेट्टी हे गौरांगाशी बोलले आणि युनायटेड किंग्डमभोवती गौरांगाच्या उर्वरित व्याख्यानमालासाठी त्यांनी हजेरी लावली.[१३] हरे कृष्ण चळवळ किंवा हरे कृष्णास या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियनेसमध्ये कॉर्पोरेशनमध्ये इंटर्निंग आणि प्रशिक्षणासाठी भारतात चार उन्हाळे घालवले आणि तीन वर्षे [१४] मुंबई, भारतातील एका आश्रमात वैदिक संन्यासी जीवनशैली जगली.[१५][१६]

शेट्टीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात Accenture येथे केली, डिजिटल स्ट्रॅटेजीवर काम केले आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया कोच म्हणून काम केले.[१७][१८] त्यांच्या कामाने एरियाना हफिंग्टनचे लक्ष वेधून घेतले, ज्याने त्याला न्यू यॉर्कमधील हफिंग्टन पोस्टसाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी नियुक्त केले,[१७][१९] त्या काळात त्यांनी असे व्हिडिओ तयार केले , जे २०१८ मध्ये फेसबुकवर सर्वाधिक पाहिले गेले .[२०] त्यांच्या व्हिडिओच्या विषयांमध्ये नातेसंबंध, निरोगीपणा, मानसिक आरोग्य आणि उद्देश यांचा समावेश आहे.[][२१] शेट्टी यांनी रसेल सिमन्स, दीपक चोप्रा, कोबे ब्रायंट आणि हफिंग्टन पोस्ट, टिम फेरिस यांच्या मुलाखती घेतल्या आहेत .[२२][२३]

शेट्टीचा २०१७ मध्ये फोर्ब्स ३०, अंडर ३० , युरोपमध्ये समावेश करण्यात आला होता. शेट्टीला नॅशनल जिओग्राफिक चेसिंग जिनियस कौन्सिल २०१७ [२४] आणि आशियाई मीडिया अवॉर्ड्स २०१६ सर्वोत्कृष्ट ब्लॉगवर मान्यता मिळाली.[२५] शेट्टी बीबीसीवर प्रदर्शित झाले आहेत आणि त्यांनी गुगल , Nasdaq, HSBC, आणि Barclays मधील प्रेक्षकांशी संवाद साधला आहे .[२६] शेट्टी २०१६ ITV एशियन मीडिया अवार्ड्स [२७] आणि २०१८ स्ट्रेअमी अवार्ड्स मध्ये पुरस्कार प्राप्तकर्ते होते.[२८]

पॉडकास्ट ऑन पर्पजचे होस्ट, शेट्टी यांनी त्यांच्या पहिल्या वर्षात ६४ दशलक्ष डाउनलोड्स गाठले.[] फोर्ब्सच्या मते ऑन पर्पज हे जगातील नंबर वन हेल्थ पॉडकास्ट बनले आहे.[२९][३०]

एप्रिल २०१९ मध्ये, शेट्टी यांना द एशियन अवॉर्ड्समध्ये उत्कृष्ट कामगिरी ऑनलाइन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि मे २०१९ मध्ये त्यांनी 11 व्या शॉर्टी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि निरोगीपणा जिंकला.[३१]

२०१९ मध्ये, सुविचार चोरी केल्याचा आरोप असताना, शेट्टीच्या इंस्टाग्रामवरून ११३ पोस्ट काढून टाकण्यात आल्या.[३२][३३] आरोप झाल्यापासून शेट्टी हे , श्रेय देण्याबाबत अधिक सावध आणि सजग आहेत.[३४]

२०१९ मधील AdWeek मासिकाच्या यंग इन्फ्लुएंशियल अंकाची शेट्टी हे कव्हर स्टोरी होते .[३५] शेट्टी हे अॅलेक्स कुशनेर यांच्यासह आयकॉन मीडिया या व्हिडिओ निर्मिती कंपनीचे सहसंस्थापक आहेत.[१७][३६]

२०२० मध्ये, शेट्टी यांनी सायमन आणि शुस्टरच्या माध्यमातून थिंक लाइक अ मंक या पुस्तकाचे प्रकाशन केले.[३७][३८] आश्रमातील शेट्टीच्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक तणाव कमी करण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी सल्ला देते.[१३] सप्टेंबर २०२० मध्ये, द वॉल स्ट्रीट जर्नल, द न्यू यॉर्क टाइम्स आणि अॅमेझॉन यांनी त्यांच्या अतिखपाच्या (बेस्टसेलर) सूचीमध्ये या पुस्तकाचे नाव दिले.[][३४][३९]

Personal life

शेट्टी, हे एक एक ब्रिटिश भारतीय आहेत , जे उत्तर लंडनमध्ये त्याचे आई-वडील आणि लहान बहिणीसोबत वाढले.[१३] त्यांची आई गुजराती आणि वडील तुलुवा आहेत. त्यांनी क्वीन एलिझाबेथ स्कूल, बार्नेट [४०] मध्ये शिक्षण घेतले आणि नंतर लंडन विद्यापीठाच्या सिटी येथील कॅस बिझनेस स्कूलमधून पदवी प्राप्त केली.[] शेट्टी त्याची पत्नी राधी देवलुकिया शेट्टीसोबत लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया येथे राहतात.[३४]

संदर्भ

  1. ^ a b "Opting Out Of The Media Mind Game, An Excerpt From The NY Times Best-Seller 'Think Like A Monk' By Jay Shetty". CBS. 23 September 2020. 30 September 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "How to manage worries during these uncertain times? Know from monk turned storyteller". Philippine Star. 30 September 2020 रोजी पाहिले.
  3. ^ a b c "Facebook Goes Global in Courting Creators, Including YouTubers". Variety. 10 February 2019. 4 May 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Meet Jay Shetty, the Motivational Vlogger and Ex-Monk Who Has Fans in the Kardashians & Ellen DeGeneres". People Magazine. 1 May 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "Facebook Goes Global in Courting Creators, Including YouTubers". India Times. 25 March 2019. 5 May 2019 रोजी पाहिले.
  6. ^ "Success In 10 Minutes: Finding Purpose with Jay Shetty Author and Former Monk". Forbes Middle East. 29 May 2020 रोजी पाहिले.
  7. ^ Bhavani, Divya Kala (2018-02-19). "Jay Shetty on redefining relationship goals". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-08-13 रोजी पाहिले.
  8. ^ a b c "'I'm living my highest purpose': mogul monk Jay Shetty on free market teachings". The Guardian. 12 September 2020. 30 September 2020 रोजी पाहिले.
  9. ^ "Motivational Speaker Jay Shetty Stops by the Ellen Show for the First Time!". EllenTube. 19 March 2019. 2019-05-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 May 2019 रोजी पाहिले.
  10. ^ Who Gets Tatted on Live TV - Lilly, Jay Shetty or Humble the Poet?
  11. ^ "Meet Jay Shetty, a former monk making 'wisdom go viral'". Today. 4 May 2019 रोजी पाहिले.
  12. ^ "Jay Shetty Offers Tips For Surviving Quarantine With Your Partner". ET Online. 3 August 2020 रोजी पाहिले.
  13. ^ a b c "Jay Shetty: 'I want to help people find calm in the chaos'". Eastern Eye. 16 September 2020. 30 September 2020 रोजी पाहिले.
  14. ^ "How to Live With More Intention, According to Former Monk Jay Shetty". GQ. 9 October 2020. 11 October 2020 रोजी पाहिले.
  15. ^ "These 3 Indian-origin men are set to change the world for the better". Vogue India. 15 August 2018. 5 May 2019 रोजी पाहिले.
  16. ^ Hoyle, Ben. "Jay Shetty: how to think like a monk (and make millions from mindfulness)". The Times. 11 October 2020 रोजी पाहिले.
  17. ^ a b c "Social media phenomenon Jay Shetty on his wild journey from monk to entrepreneur — and why he says being disappointed is a normal part of a meaningful life". Business Insider. 30 September 2020 रोजी पाहिले.
  18. ^ "Influencer Jay Shetty says successful people share 3 traits". Yahoo! Finance. 30 September 2020 रोजी पाहिले.
  19. ^ "Jay Shetty". Huffington Post. 4 May 2019 रोजी पाहिले.
  20. ^ "Surprise: A New Analysis of 777 Million Facebook Posts Reveals Positivity Outperforms Negativity". INC. 14 January 2019. 4 May 2019 रोजी पाहिले.
  21. ^ "Jada Pinkett Smith Discusses Love Relationships with Jay Shetty". People. 14 July 2019 रोजी पाहिले.
  22. ^ "Forbes 30 Under 30 Europe: Media". Forbes. 5 May 2019 रोजी पाहिले.
  23. ^ "Meet Jay Shetty, the Motivational Vlogger and Ex-Monk Who Has Fans in the Kardashians & Ellen DeGeneres". People. 19 Feb 2020 रोजी पाहिले.
  24. ^ Nunez, Christina (2017-07-27). "An Ex-Monk's Advice on How to Follow Your True Path". National Geographic News. 2019-07-15 रोजी पाहिले.
  25. ^ "Jay Shetty: How He's Mastered The New Media Landscape". Forbes. 5 May 2019 रोजी पाहिले.
  26. ^ "Jay Shetty". Huffington Post. 4 May 2019 रोजी पाहिले.
  27. ^ "Jay Shetty Wins Espoke Living Best Blog Award 2016". Asian Media Awards. 7 November 2016. 5 May 2019 रोजी पाहिले.
  28. ^ "8th Annual Nominees & Winners". Streamys. 5 May 2019 रोजी पाहिले.
  29. ^ "Jay Shetty Teaches You How To Think Like A Monk". Forbes. 14 September 2020 रोजी पाहिले.
  30. ^ "Social Media Star Jay Shetty On How To Think Like A Monk". Grazia magazine. 14 September 2020 रोजी पाहिले.
  31. ^ "Winners of the 9th Asian Awards". The Asian Awards. 4 September 2019 रोजी पाहिले.
  32. ^ "YouTuber Nicole Arbour Exposes Internet Guru And Ex-Monk Jay Shetty, Accuses Him Of Plagiarism!". IndiaTimes (इंग्रजी भाषेत). 2019-08-27. 2020-08-14 रोजी पाहिले.
  33. ^ "BeingIndian.com". Beingindian (इंग्रजी भाषेत). 2020-02-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-14 रोजी पाहिले.
  34. ^ a b c "Internet Star 'Exposes' Award-Winning Life Coach Jay Shetty for Plagiarizing Quotes". The National. 27 August 2019. 30 September 2020 रोजी पाहिले.
  35. ^ "On the Adweek Podcast: Jay Shetty Is Making Wisdom Go Viral". AdWeek. 30 September 2020 रोजी पाहिले.
  36. ^ "Influencer Jay Shetty's Icon Media sets shop in India". Exchange Media. 30 September 2020 रोजी पाहिले.
  37. ^ "Former monk Jay Shetty on coronavirus stress: Find things that bring you joy". AdWeek. 3 August 2020 रोजी पाहिले.
  38. ^ "Jay Shetty, Author, Former Monk - Brief But Spectacular". PBS. 30 April 2020. 31 July 2020 रोजी पाहिले.
  39. ^ "Bestselling Books Week Ended September 19". The Wall Street Journal. 24 September 2020. 30 September 2020 रोजी पाहिले.
  40. ^ "Award-winning vlogger, filmmaker, online personality and former monk Jay Shetty (OE 1999–2006) has now been named in the 2017 Forbes European 30 Under 30". Queen Elizabeth’s School. 20 February 2017. 5 May 2019 रोजी पाहिले.