जयशंकर भूपालपल्ली जिल्हा
जयशंकर भूपालपल्ली जिल्हा జయశంకర్ భూపాలపల్లి జిల్లా(तेलुगु) | |
तेलंगणा राज्यातील जिल्हा | |
तेलंगणा मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | तेलंगणा |
मुख्यालय | भूपालपल्ली |
निर्मिती | ११-१०-२०१६ |
नावाचे मूळ | प्रा. के. जयशंकर |
मंडळ | ११ |
क्षेत्रफळ | |
- एकूण | २,२९३ चौरस किमी (८८५ चौ. मैल) |
भाषा | |
- अधिकृत भाषा | तेलुगु |
लोकसंख्या | |
-एकूण | ४,१६,७६३ (२०११) |
-लोकसंख्या घनता | १८२ प्रति चौरस किमी (४७० /चौ. मैल) |
-शहरी लोकसंख्या | १३.७% |
-साक्षरता दर | ६१.९७% |
-लिंग गुणोत्तर | १०००/ १००९ ♂/♀ |
राष्ट्रीय महामार्ग | रा.म. ३६३ |
वाहन नोंदणी | TS–25 |
संकेतस्थळ |
जयशंकर भूपालपल्ली हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. भूपालपल्ली येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
जयशंकर भूपालपल्ली (आचार्य जयशंकर) जिल्हा हा पूर्वीचा वरंगल जिल्हा करीमनगर जिल्ह्याच्या काही भागांच्या जोडणीसह आणि १ महसूल विभाग आणि ११ मंडळांसह तयार करण्यात आला आहे. ११-१०-२०१६ रोजी स्थापन झालेल्या जिल्ह्याचे नाव तेलंगणाचे विचारवंत, प्रा. के. जयशंकर सर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.[१][२]
भूगोल
जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,२९३ चौरस किलोमीटर (८८५ चौरस मैल) आहे. जिल्ह्याच्या सीमा पेद्दपल्ली, मंचिर्याल, मुलुगु, वरंगल, करीमनगर आणि हनमकोंडा जिल्ह्यांसह छत्तीसगढ आणि महाराष्ट्र राज्यांसोबतआहेत.
लोकसंख्या
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याची लोकसंख्या ४,१६,७६३ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १००९ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६१.९७% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १३.७% लोक शहरी भागात राहतात.[३]
मंडळ (तहसील)
जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्या मध्ये ११ मंडळे आहेत:
क्रम | मंडळ |
---|---|
१ | भूपालपल्ली |
२ | गणपूर (मुलुगु) |
३ | मोगुल्लापल्ली |
४ | रेगोंडा |
५ | चित्याला |
६ | तेकुमटला |
७ | मल्हार राव |
८ | काटारम |
९ | महादेवपूर |
१० | पलिमेला |
११ | मुलुगपल्ली |
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ "Jayashankar Bhupalpally District | Welcome to Jayashankar Bhupalpally District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-26 रोजी पाहिले.
- ^ Sravan (2018-02-11). "Telangana New Districts Names 2018 Pdf TS 31 Districts List". Timesalert.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-26 रोजी पाहिले.
- ^ "Demography | Jayashankar Bhupalpally District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-26 रोजी पाहिले.