Jump to content

जयमाला शिलेदार

जयमाला शिलेदार
जन्म१९२६
मृत्यू ८ ऑगस्ट २०१३
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र नाटक
भाषामराठी
प्रमुख नाटके संगीत शाकुंतल, संगीत स्वयंवर, संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, संगीत शारदा
पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार (२००६), तीन बालगंधर्व पुरस्कार, पद्मश्री
वडील नारायणराव जाधव
पतीजयराम शिलेदार

जयमाला शिलेदार या लहानपणी बेळगावात जयपूर घराण्याच्या मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे दोन वर्षं गायन शिकत होत्या.
१९४२ पासून त्यांनी मराठी संगीत रंगभूमीवर अनेक अजरामर भूमिका यांनी केल्या. २००३ मध्ये त्यांची मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एकमताने निवड झाली होती. हे नाट्यसंमेलन अहमदनगर येथे भरवण्यात आले होते.

मृत्यू

किडनीच्या विकाराने आजारी असलेल्या जयमालाबाईंवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे उपचार सुरू होते. ८ ऑगस्ट २०१३ रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

जयमाला शिलेदार यांनी विविध नाटकांतून केलेल्या भूमिका

नाटकभूमिका
संगीत शांकुतलशकुंतला
संगीत स्वयंवररुक्मिणी
संगीत सौभद्रसुभद्रा
संगीत एकच प्यालासिंधू
संगीत शारदाशारदा

जयमाला शिलेदार यांनी गायलेली प्रसिद्ध गीते

  • अंगणी पारिजात फुलला
  • कोपलास कां दया सागरा
  • येतिल कधि यदुवीर

जयमाला शिलेदार यांना मिळालेले पुरस्कार

सालपुरस्कार
२००६लता मंगेशकर पुरस्कार
? ? ?तीन बालगंधर्व पुरस्कार
२०१३पद्मश्री पुरस्कार[]

जयमाला शिलेदार यांच्यासंबंधी प्रकाशित साहित्य

  • ’सूर रंगी रंगती’ - जयमाला शिलेदार यांच्या रंगभूमीवरील योगदानावरचा माहितीपट.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ गृह मंत्रालय, भारत सरकार. "Padma Awards Announced" (इंग्रजी भाषेत). ६ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

जयमाला शिलेदार यांची ’आठवणीतली गाणी’वरील गीते