जयपूर साहित्य उत्सव
जयपूर साहित्य उत्सव हा जयपूर मध्ये साजरा होणारा साहित्य उत्सव आहे. जानेवारी महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो. याचा कालावधी पाच दिवस असतो. हा उत्सव दिग्गी राजवाड्यात भरवला जातो. या उत्सवाची मूळ कल्पना फतेह सिंह यांची आहे. हा जयपूर विरासत फाउंडेशन द्वारे आयोजित केला जातो.
स्वरूप
यात एका दिवसात सुमारे तीस साहित्य विषयक सत्रे होतात. या सत्रांचे स्वरूप हे पुस्तकांचे प्रकाशन, लेखकांशी गप्पा, साहित्यिक मुलाखती, कवींचे कार्यक्रम, लेखक आणि विचारवंतांच्या मुलाखती, साहित्यिक, सामाजिक, राजकीय विषयांवर चर्चा असे असते.