Jump to content

जयपूर, महाराष्ट्र

या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.

पुरंदर जाधव

औरंगाबामधील डोंगराच्या कुशीतले गुलाबी जयपूर

निसर्गत: आखीव-रेखीव असलेले हे गाव औरंगाबाद तालुक्यात आहे. करमाड फाट्यापासून पाच किलोमीटर आत गेल्यावर डोंगरांच्या कुशीत लपलेले गाव दिसते. रेल्वे फाट्यापासून आत चिंचोळा रस्ता लागतो. रस्त्याच्या दुतर्फा उन्हाळ्यातही हिरवीगार शेतं दिसतात. ऊस, डाळिंब अन् भाजीपाला या गावात पिकतो. दुतर्फा शेतांमधून जाणारी वाट गावाच्या वेशीजवळ पोहोचली की निळ्याशार पाण्याने भलेमोठे तळे आपले स्वागत करते. त्यातून वाहणारी शीतल वा-याची झुळूक मन प्रसन्न करते. असे असले तरी एखाद्या पर्यटनस्थळापेक्षाही सुंदर असलेल्या या गावाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. आपल्या शहराजवळच असे अनोखे गाव असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीबी स्टार चमू भल्या पहाटेच गावात पोहोचला. एव्हाना अवघा गाव आळस झटकून ताजातवाना होत होता. बहुतांश घरे सडासमार्जन होऊन सुंदर रांगोळ्यांनी सजली होती. कुणी अंघोळ करून लगबगीने दत्त टेकडीकडे दर्शनासाठी जात होता, तर कुणी न्याहरी घेऊन शेतकरी रानात जाण्याच्या तयारीत होते. दुधाचे कॅन घेऊन काही जण शहराकडे निघाले होते. गुरुजी रागावतील या भीतीने मुलांची शाळेत जाण्याची लगबग सुरू होती. काही गुलाबी रंगाच्या जुन्या दगडी वाड्यांसमोर उन्हाळ्याचे वाळवण अंगणात पसरवत आई-भगिनींची वेगळीच धांदल उडताना दिसत होती. एखाद्या लहान चिमुकल्याला आईने अंघोळ घालून नीटनेटके करावे तसेच हे गावही नटले होते. कुठेही कचरा नाही. सुंदर सिमेंटचे रस्ते आणि शहरापेक्षाही चांगली ड्रेनेजलाइन या गावाचे वैशिष्ट्ये. खूप छोटे, पण व्यवसायाच्या दृष्टीने मोठे असलेल्या या गावात उणीपुरी 250 घरे असून लोकसंख्या फक्त 1185 आहे. करमाड सर्कलमधले सर्वात सधन गाव म्हणून या गावाची ओळख. सरपंच हरिश्चंद्र मते हे आहेत. त्यांचा वाडाही खूप जुना आणि सुंदर नक्षीकाम केलेला आहे. राजस्थानातील जयपूरचा या गावाशी संबंध असल्याने या गावाचे नावही जयपूर पडले असण्याची शक्यता सरपंच व्यक्त करतात. अजयगड येथील एका योद्ध्याने हे गाव वसवले आहे. दौलताबादवर त्याने स्वारी केली. त्यावेळी त्याला बीड रोडवरील पिंपळगावची जहागिरी मिळाली. तेथे अजूनही जुनी गढी असल्याचे गावकरी सांगतात. या गावात राजभाट नेहमी यायचे. त्यांच्याकडे गावातील प्रत्येक पिढीची वंशावळ आहे. पूर्वी ते दरवर्षी यायचे; पण आता 10 ते 15 वर्षांनी येतात.सरकारने गावात तंटामुक्ती योजना राबवलीय खरी, पण या जयपूर गावाला त्याची कधी गरजच पडली नाही. गावात भांडणे होत नाहीत असे नाही, पण ती कधी चव्हाट्यावर येत नाहीत. कुणाच्या घरी लग्न असेल तर संपूर्ण गाव त्याची जबाबदारी घेतो. ज्याच्या घरी लग्न आहे त्यांनी फक्त स्वागताला थांबायचे, बाकी सगळे काम गावकरी करतात. दरवर्षी सरपंचाची निवड बिनविरोध होते, यातच या गावाचे मोठेपण दिसते. गावाचे क्षेत्रफळ 1400 हेक्टर आहे. चहूबाजूंनी पाणी असल्याने येथे ऊस, डाळिंब, मोसंबी, कापूस, भाज्या पिकवल्या जातात. गावातील पिके संपूर्ण राज्यात जातात. लहुकी नदीच्या धरणामुळे गावात पाणी आहे. मोठा तलाव व सात पाझर तलाव आहेत. स्वच्छता मोेहीम, पाइपलाइन अन् रस्ते यांचा विकास भारत निर्माण योजनेतून केलाय. गावात जाताना भव्य प्रवेशद्वार आहे अन् संपूर्ण गावाला तटबंदी आहे. ती गावक-यांनी लोकवर्गणीतून बांधली आहे. गावातील सर्वच लोकांचे आडनाव मते आहे. सपूर्ण नाव सांगितल्याशिवाय एखादा माणूस शोधणे तसे अवघडच. 98 टक्के लोक मते हेच आडनाव लावतात. गावात इतर समाजाचेही लोक आहेत. ते सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात.गावातील बहुतांश घरे गुलाबी रंगाची आहेत. याचे कारण हे संपूर्ण गाव महानुभव उपदेशी आहे. खूप वर्षांपूर्वी बाभुळगावकर महाराजांनी गावात महाचिंतन शिबिर घेतले होते. तेव्हापासून गावक-यांनी शाकाहारच घेण्याची शपथ घेतली. गावात मध्यभागी एक टेकडी असून तेथे दत्ताचे जुने मंदिर आहे. गावात चोहोबाजूंनी शेती असूनही एक माणूस, एक झाड लावण्याचा संकल्प गावक-यांनी केला आहे. प्रत्येकाने एक झाड दत्तक घेतले असून ते मोठे होईपर्यंत देखभाल करतो. त्यामुळे वनराईने नटलेल्या या गावातील नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

village
village
village
village