Jump to content

जयंत खरे

जयंत खरे
पूर्ण नावजयंत प्रभाकर खरे
जन्म
मृत्यूमे १, २००७
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रचित्रकला, कलाअध्यापन
प्रशिक्षणजे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
शैलीलघुचित्र

जयंत खरे (??-मे १, २००७) हे लघुचित्रांकरिता ओळखले जाणारे मराठी चित्रकार होते. पुण्यातील पर्वती टेकडीवरील पेशवे स्मृतिसंग्रहालयातील लघुचित्रे खऱ्यांनी रंगवली आहेत.

जीवन

खऱ्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये घेतले. पदविका अभ्यासक्रमानंतर ते अध्यापनाकरता तेथेच रुजू झाले. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील अध्यापनाखेरीज ते पुण्यातील आगाखान पॅलेस येथील संग्रहालयाचे क्युरेटर म्हणून काम पाहत होते.
मे १, २००७ रोजी पुण्यात खऱ्यांचे निधन झाले.

संकीर्ण माहिती

खऱ्यांनी पेशवेकालीन ऐतिहासिक घटनांबद्दल ’पेशवाईतील आठवणी’ नावाचे एक रंजक पुस्तक लिहिले आहे.

बाह्य दुवे