जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी | |
---|---|
पक्षाध्यक्ष | मेहबूबा मुफ्ती |
स्थापना | १९९९ |
मुख्यालय | श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर |
लोकसभेमधील जागा | ३ / ५४५ |
राज्यसभेमधील जागा | ० / २४५ |
विधानसभेमधील जागा | २८ / ८७ (जम्मू आणि काश्मीर) |
राजकीय तत्त्वे | जम्मू काश्मीरला स्वायत्तता |
संकेतस्थळ | www.jkpdp.org |
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (इंग्लिश: Jammu and Kashmir People's Democratic Party) हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील राजकीय पक्ष आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद ह्यांनी इ.स. १९९९ साली या पक्षाची स्थापना केली. ऑक्टोबर, इ.स. २००२ मध्ये या पक्षाने जम्मू आणि काश्मीर राज्याची सत्ता काबीज केली. इ.स. २००९पर्यंत हा संयुक्त पुरोगामी आघाडीचा एक घटक पक्ष होता. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये पीडीपीने राज्यातील सहापैकी ३ जागांवर विजय मिळवला. मेहबूबा मुफ्ती ही पीडीपीची विद्यमान पक्षाध्यक्ष तर मुफ्ती महंमद सईद हे वरिष्ठ सल्लागार आहेत.
२०१४ जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांमध्ये ८७ पैकी २८ जागांवर विजय मिळवून पीडीपी हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर १ मार्च २०१५ रोजी पीडीपीने भारतीय जनता पक्षासोबत आघाडी सरकारची स्थापना केली. मुफ्ती महंमद सईद हे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
बाह्य दुवे
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)