जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री
जम्मू आणि काश्मीरचा मुख्यमंत्री हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर सरकारप्रमुख आहे. ३० मार्च १९६५ पूर्वी ह्या राज्याचा मुख्यमंत्री पंतप्रधान (वझीर-ए-आझम) तर राज्यपाल राष्ट्रपती (सद्र-ए-रियासत) ह्या नावाने ओळखले जात असत. जम्मू काश्मीरच्या संविधानात १९६५ साली बदल घडवण्यात आले व वझीर-ए-आझम आणि सद्र-ए-रियासत ही पदे बरखास्त करून मुख्यमंत्री व राज्यपाल पदे निर्माण केली गेली. जम्मू आणि काश्मीरचा राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर सहा वर्षे राहू शकतो (इतर राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपद कमाल ५ वर्षांचे असते).
यादी
वझीर-ए-आझम
क्रम | नाव | कार्यकाळ[१] (अवधी) | पक्ष |
---|---|---|---|
1 | मेहरचंद महाजन | 15 ऑक्टोबर 1947 – 5 मार्च 1948 ( ० वर्षे, १४२ दिवस) | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
2 | शेख अब्दुल्ला | 5 मार्च 1948 – 9 ऑगस्ट 1953 ( ५ वर्षे, १५७ दिवस) | नॅशनल कॉन्फरन्स |
3 | बक्षी गुलाम महंमद | 9 ऑगस्ट 1953 – 12 ऑक्टोबर 1963 ( १० वर्षे, ६४ दिवस) | |
4 | ख्वाजा शमशुद्दीन | 12 ऑक्टोबर 1963 – 29 फेब्रुवारी 1964 ( ० वर्षे, १४० दिवस | |
5 | गुलाम मोहम्मद सादिक | 29 फेब्रुवारी 1964 – 30 मार्च 1965 ( १ वर्ष, ३० दिवस) | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
मुख्यमंत्री
क्रम | नाव | कार्यकाळ[१] (अवधी) | पक्ष |
---|---|---|---|
1 | गुलाम मोहम्मद सादिक | 30 मार्च 1965 – 12 डिसेंबर 1971 ( ६ वर्षे, २५७ दिवस) | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
2 | सय्यद मिर्झा कासिम | 12 डिसेंबर 1971 – 25 फेब्रुवारी 1975 ( ३ वर्षे, ७५ दिवस | |
3 | शेख अब्दुल्ला | 25 फेब्रुवारी 1975 – 26 मार्च 1977 ( २ वर्षे, २९ दिवस) | नॅशनल कॉन्फरन्स |
– | पद रिकामे[a] (राष्ट्रपती राजवट) | 26 मार्च – 9 जुलै 1977 ( ० वर्षे, १०५ दिवस) | N/A |
(3) | शेख अब्दुल्ला [2] | 9 जुलै 1977 – 8 सप्टेंबर 1982 ( ५ वर्षे, ६१ दिवस) | नॅशनल कॉन्फरन्स |
4 | फारूक अब्दुल्ला | 8 सप्टेंबर 1982 – 2 जुलै 1984 ( १ वर्ष, २९८ दिवस | |
5 | गुलाम मोहम्मद शाह | 2 जुलै 1984 – 6 मार्च 1986 ( १ वर्ष, २४७ दिवस) | आवामी नॅशनल कॉन्फरन्स |
– | पद रिकामे (राष्ट्रपती राजवट) | 6 मार्च – 7 नोव्हेंबर 1986 ( ० वर्षे, २४६ दिवस) | N/A |
(4) | फारूक अब्दुल्ला [2] | 7 नोव्हेंबर 1986 – 19 जानेवारी 1990 ( ३ वर्षे, ७३ दिवस) | नॅशनल कॉन्फरन्स |
– | पद रिकामे (राष्ट्रपती राजवट) | 19 जानेवारी 1990 – 9 ऑक्टोबर 1996 ( ६ वर्षे, २६४ दिवस) | N/A |
(4) | फारूक अब्दुल्ला [3] | 9 ऑक्टोबर 1996 – 18 ऑक्टोबर 2002 ( ६ वर्षे, ९ दिवस) | नॅशनल कॉन्फरन्स |
– | पद रिकामे (राष्ट्रपती राजवट) | 18 ऑक्टोबर – 2 नोव्हेंबर 2002 ( ० वर्षे, १५ दिवस) | N/A |
6 | मुफ्ती महंमद सईद | 2 नोव्हेंबर 2002 – 2 नोव्हेंबर 2005 ( ३ वर्षे, ० दिवस) | पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी |
7 | गुलाम नबी आझाद | 2 नोव्हेंबर 2005 – 11 जुलै 2008 ( २ वर्षे, २५२ दिवस) | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
– | पद रिकामे (राष्ट्रपती राजवट) | 11 जुलै 2008 – 5 जानेवारी 2009 ( ० वर्षे, १७८ दिवस) | N/A |
8 | ओमर अब्दुल्ला | 5 जानेवारी 2009 – 8 जानेवारी 2015 ( ६ वर्षे, ३ दिवस) | नॅशनल कॉन्फरन्स |
– | पद रिकामे[३] (राष्ट्रपती राजवट) | 8 जानेवारी 2015 – 1 मार्च 2015 ( ० वर्षे, ५२ दिवस) | N/A |
(6) | मुफ्ती महंमद सईद | 1 मार्च 2015 – 7 जानेवारी 2016 ( ० वर्षे, ३१२ दिवस) | पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी |
– | पद रिकामे (राष्ट्रपती राजवट | 7 जानेवारी 2016 – 4 एप्रिल 2016 ( ० वर्षे, ८८ दिवस) | |
9 | मेहबूबा मुफ्ती | 4 एप्रिल 2016 - 30 जून 2018 ( २ वर्षे, ७२ दिवस) | पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी |
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b Prime Ministers and Chief Ministers of Jammu and Kashmir since 1947. General Administration Department, Government of Jammu and Kashmir. Retrieved on 29 April 2014.
- ^ अंबरीष दिवाणजी. "राष्ट्रपती राजवटीवरील माहिती". Rediff.com. 15 मार्च 2005.
- ^ Bharti Jain. "Governor's rule imposed in Jammu & Kashmir". The Times of India. 9 जानेवारी 2015.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.