जमुना देवी
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर २९, इ.स. १९२९ Sardarpur | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. २००८ इंदूर | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
जमुना देवी (१९ नोव्हेंबर १९२९ - २४ सप्टेंबर २०१०) ह्या मध्य प्रदेशमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या. त्या मध्य प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या आणि त्यांनी विरोधी पक्षनेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून काम केले.[१] त्या झाबुआ येथून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या (१९६२-६७). १९७८ ते १९८१ या काळात त्या राज्यसभेच्या सदस्या देखील होत्या.[२] त्या लोकांमध्ये बुवाजी म्हणून ओळखल्या जात.
कार्य
जमुना देवी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२९ रोजी सरदापूर, धार जिल्हा येथे झाला होता. १९५२ ते १९५७ या काळात त्या मध्य भारत राज्याच्या पहिल्या विधानसभेच्या सदस्य होत्या. त्यानंतर १९६२ ते १९६७ पर्यंत झाबुआच्या (आताचे रतलाम मतदारसंघ) खासदार होत्या. तसेच १९७८ ते १९८१ पर्यंत त्या राज्यसभा सदस्य होत्या.
अर्जुन सिंग, मोतीलाल व्होरा आणि श्यामा चरण शुक्ला यांच्या सरकारमध्ये त्यांनी कनिष्ठ मंत्रीचे काम सांभाळले. परंतु दिग्विजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आणि नंतर १९९८ मध्ये त्यांना मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदी बढती देण्यात आली. अशा प्रकारे त्या भारताच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या.
२००३ मध्ये जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता गेली तेव्हा त्यांचे विरोधी पक्षनेते म्हणून नाव देण्यात आले आणि २०१० पर्यंत त्या ह्या पदावर राहिल्या.[३] [४]
मृत्यू
पोटाच्या कर्करोगाविरुद्ध दीर्घकाळ लढा दिल्यानंतर देवी यांचे २४ सप्टेंबर २०१० रोजी इंदूरमध्ये एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या व त्यांच्या पश्च्यात त्यांची एक मुलगी होती.[५][६][७][८][९]
संदर्भ
- ^ "MP Legislative Assembly".
- ^ "Congress leader Jamuna Devi passes away". 24 September 2010.
- ^ Cong leader Jamuna Devi passes away
- ^ MP Leader of Oppn Jamuna Devi dies at 80
- ^ MP Leader of Oppn Jamuna Devi dies at 80
- ^ Singh, Mahim Pratap (24 Sep 2010). "Veteran Congress leader Jamuna Devi passes away" (English भाषेत). Bhopal: thehindu.com. The Hindu. 17 June 2018 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Cong leader Jamuna Devi passes away" (English भाषेत). Bhopal: indiatoday.in. ITGD Bureau. 24 Sep 2010. 17 June 2018 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "MP's senior INC leader Jamuna Devi passes away" (Hindi भाषेत). Indore: hindi.oneindia.com. 24 Sep 2010. 17 June 2018 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "MP Leader of Oppn Jamuna Devi aka Buaji is dead" (English भाषेत). Indore: news.webindia123.com. UNI. 24 Sep 2010. 2018-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 June 2018 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)