Jump to content

जमा (अर्थव्यवहार)

अर्थव्यवहारात खात्यावर रक्कम जमा होणे (इंग्लिश: Credit) म्हणजे त्या खात्याची शिल्लक वाढणे होय.

बँकेत किंवा इतर वित्तसंस्थेत ज्याचे खाते असते त्या खातेदाराने आपल्या खात्यामध्ये पैसे भरणे याला 'खात्यावर रक्कम जमा होणे ' असे म्हणतात.

वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'जमा' या शब्दाचा अर्थ बदलतो

१) व्यक्तिगत खाते - जो पैसे देतो त्याचे खाते जमा होते (धनको). जो पैसे घेतो त्याचे खाते नावे होते.

२) मालमत्ता खाती - जी मालमत्ता बाहेर जाते ती खात्यावर जमा होते. जी मालमत्ता आत येते ती खात्यावर नावे होते.

३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.