Jump to content

जपानी साम्राज्य

जपानी साम्राज्य
दाइ निप्पॉन तेइकोकु
大日本帝國

इ.स. १८६८इ.स. १९४७
ध्वजचिन्ह
ब्रीदवाक्य: 八紘一宇
हाक्को इचीउ
(सर्व जग एका छत्राखाली!)
राजधानीतोक्यो
राष्ट्रप्रमुखमैजी (इ.स. १८६८ - इ.स. १९१२)
तैशो (इ.स. १९१२ - इ.स. १९२६)
हिरोहितो - (इ.स. १९२६ - इ.स. १९४७)
पंतप्रधानहिरोबुमी इतो (इ.स. १८८५-८८, इ.स. १८९२-९६, इ.स. १८९८, इ.स. १९००-०१)
फुमिमारो कोनोये (इ.स. १९३७-३९, इ.स. १९४०-४१)
हिदेकी तोजो (इ.स. १९४१-४४)
शिगेरू योशिदा (इ.स. १९४६-४७)
धर्मबौद्ध
राष्ट्रीय चलनजपानी येन
आजच्या देशांचे भागजपान ध्वज जपान
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया
रशिया ध्वज रशिया
Flag of the People's Republic of China चीन
Flag of the Republic of China तैवान (तैवान)

जपानी साम्राज्य (जपानी: 大日本帝國) हे इ.स. १८६८ ते इ.स. १९४७ या कालखंडात अस्तित्वात असलेले, वर्तमान जपान देशाचे पूर्ववर्ती साम्राज्य होते. ३ जानेवारी, इ.स. १८६८ रोजी मेइजी पुनर्स्थापनेनंतर हे साम्राज्य उदय पावले व दुसऱ्या महायुद्धात पराभव झाल्यानंतर ३ मे, इ.स. १९४७ रोजी या साम्राज्याचा अस्त झाला.

जपानी साम्राज्याने "फुकोकु क्योहेई" (जपानी: 富国強兵 ; अर्थ: देश श्रीमंत करा! सैन्याची ताकद वाढवा!) या प्रकल्पांतर्गत देशाचे सैनिकीकरण व उद्योगीकरण आरंभले. यामुळे जपानी साम्राज्य जागतिक शक्ती बनले.

जपानी साम्राज्यकाळादरम्यान ह्या देशाने झपाट्याने प्रगती केली व तो जगातील एक प्रगत देश बनला. साम्राज्यवाढीने झपाटलेल्या जपानी राज्यकर्त्यांनी दुसऱ्या महायुद्धात अक्ष राष्ट्रांसोबत हातमिळवणी केली व पूर्व आशियामधील अनेक देशांवर लष्करी चढाया केल्या. हिरोशिमा व नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यांनंतर जपानी साम्राज्याने २ सप्टेंबर १९४५ रोजी दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्कारली. त्यानंतर अमेरिकेच्या मदतीने जपान देशाचे संविधान पुन्हा लिहिले गेले व ३ मे, इ.स. १९४७ रोजी जपान ह्याच नावाने हा देश ओळखला जाऊ लागला.

युद्धे

जपानी साम्राज्य पुढील युद्धात सहभागी झाले
युद्ध वर्ष प्रतिस्पर्धी
पहिले चीन-जपान युद्ध इ.स. १८९४-इ.स. १८९५छिंग राजवंश
जपान-रशिया युद्ध इ.स. १९०४-इ.स. १९०५रशियन साम्राज्य
पहिले महायुद्धइ.स. १९१४-इ.स. १९१८केंद्रवर्ती सत्ता
सैबेरीयाचे युद्ध इ.स. १९१८-इ.स. १९२०रशियन साम्राज्य
दुसरे चीन-जपान युद्धइ.स. १९३७-इ.स. १९४५चीनचे प्रजासत्ताक
दुसरे महायुद्धइ.स. १९३९-इ.स. १९४५दोस्त राष्ट्रे

बाह्य दुवे

  • "जपानने पराभव स्वीकारल्याचे मूळ शरणपत्र" (इंग्लिश भाषेत). 2008-05-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-01-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)