Jump to content

जपानमधील सौर ऊर्जा

जपानची संभाव्य सौर क्षमता

जपानमधील सौर ऊर्जेचा १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात विस्तार होताना दिसला. हा देश फोटोव्होल्टिक (पीव्ही) आणि घरात बसवता येण्याजोगी पीव्ही प्रणालीसाठीचा एक प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहे. घरातील पीव्ही प्रणाली बहुतेकदा ग्रिडला जोडलेली असते.[]

देशाच्या धोरणात बदल झाल्यापासून सौर ऊर्जा ही एक महत्त्वाची राष्ट्रीय प्राथमिकता बनली आहे. स.न. २०११ मध्ये घडलेल्या फुकुशिमा दाइची अणु आपत्तीनंतर नपानेने नवीकरणीय (अपारंपरिक) ऊर्जेवर अधिक लक्ष केंद्रित केले.[][] २०१३ आणि २०१४ मध्ये सौर ऊर्जेच्या वाढीसाठी जपान जगातील दुसरा सर्वात मोठा बाजार बनला होता. ज्यामध्ये अनुक्रमे ६.९७ गिगावॅट आणि ९.७४ गिगावॅट क्षमता जोडली गेली. स.न. २०१७ च्या अखेरीस, एकूण क्षमता ५० गिगावॅटपर्यंत पोहोचली. ही चीननंतर जगातील दुसरी सर्वात मोठी सौर पीव्ही स्थापित क्षमता होती.[][] २०१६ मध्ये एकूण स्थापित क्षमता देशाच्या वार्षिक वीज मागणीच्या जवळजवळ ५% पुरवठा करण्यासाठी पुरेशी असल्याचे अंदाज लावण्यात आला होता.[]

सौर उत्पादन उद्योग

जपानी सौर सेल उत्पादन (मध्ये जीडब्ल्यू)



  एकुण    निर्यात    देशांतर्गत

जपानमधील फोटोव्होल्टिक उत्पादक आणि निर्यातदारांमध्ये क्योसेरा, मित्सुबिशी इलेक्ट्रिक, मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज, सान्यो, शार्प सोलार, सोलार फ्रंटियर आणि तोशिबा यांचा समावेश होतो.

सरकारी कारवाई

फीड-इन दर

जपान सरकार अनुदान देऊन सौर उर्जेचा विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठे ते फीड-इन दर (फिट) पद्धतीचाही वापर करीत आहेत. डिसेंबर २००८ मध्ये, अर्थ, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने ७०% नवीन घरांमध्ये सौर उर्जा स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले होते. २००९ च्या पहिल्या तिमाहीत घरगुती सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी १४५ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली होती.[] नोव्हेंबर २००९ मध्ये सरकारने एक फीड-इन टॅरिफ लागू केला ज्यामध्ये युटिलिटीजना घरे आणि व्यवसायांद्वारे ग्रिडमध्ये पाठविलेल्या अतिरिक्त सौर उर्जेची खरेदी करणे आणि त्या उर्जेसाठी मानक वीज दरापेक्षा दुप्पट पैसे देणे आवश्यक झाले होते.[]

१८ जून २०१२ रोजी ४२ येन/किलोवॅट तासाच्या नवीन फीड-इन टॅरिफला मान्यता देण्यात आली. या दरात १० किलोवॅट पेक्षा कमी प्रणालींसाठी पहिल्या दहा वर्षांच्या अतिरिक्त उत्पादनाचा समावेश आहे. , १० किलोवॅट पेक्षा अधिक प्रणालींसाठी पहिल्या वीस वर्षांच्या अतिरिक्त उत्पादनाचा समावेश आहे. १ जुलै २०१२ रोजी ते लागू झाले.[] एप्रिल २०१३ मध्ये, एफआयटी ३७.८ येन/किलोवॅट प्रति तास पर्यंत कमी करण्यात आला.[] एप्रिल २०१४ मध्ये एफआयटी ३२ येन/किलोवॅट प्रति तास पर्यंत कमी करण्यात आला.[१०]

मार्च २०१६ मध्ये, फोटोव्होल्टिक उर्जेद्वारे तयार केलेल्या विजेसाठी नवीन फीड-इन दर मंजूर करण्यात आला. खरेदी किंमत गणना समितीने आर्थिक वर्ष २०१६ च्या खरेदी किंमती आणि त्या लागू होण्याच्या कालावधीबाबत शिफारसी तयार केल्या आणि प्रसिद्ध केल्या. या शिफारसींचा आदर करत एमईटीआयने या शिफारसींना खालीलप्रमाणे अंतिम स्वरूप दिले आहे:

  • घरगुती नसलेले ग्राहक (१० किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त): २७ येन/किलोवॅट ते २४ येन/किलोवॅट पर्यंत कमी केले.
  • घरगुती ग्राहक (१० किलोवॅट किंवा त्यापेक्षा कमी) ३३ येन/किलोवॅट वरून ३१ येन/किलोवॅट पर्यंत कमी करण्यात आले होते. परंतु जेव्हा जनरेटरला आउटपुट कंट्रोल उपकरणे बसविण्याची आवश्यकता असते तेव्हा किंमत ३५ येन/किलोवॅट वरून ३३ येन/किलोवॅट पर्यंत कमी केला गेला.[११]

१० किलोवॅट पेक्षा कमी प्रणालींसाठी निवासी पीव्ही फीड-इन दर परिस्थितीनुसार २०१७ मध्ये केडब्ल्यूला २४ येन/किलोवॅट ते २८ येन/किलोवॅट दरम्यानच्या मूल्य निर्धारीत झाले. २०१९ पर्यंत हेच दर ठेवण्यात आले.[१२]

सर्वात अलीकडील एफआयटी केवळ निवासी नसलेल्या सौर उर्जा प्रकल्पांशी संबंधित आहे. नवीन नॉन-रेसिडेन्शियल एफआयटी २०१७ मध्ये २१ येन/किलोवॅट वरून १८ येन/किलोवॅट पर्यंत तर एप्रिल २०१८ मध्ये आणि नंतर प्रमाणित सुविधांसाठी कमी करण्यात येणार होती.[१२]

{{{content}}}

संदर्भ

  1. ^ "Cumulative Installed Solar Photovoltaics Capacity in Leading Countries and the World, 2000-2013". Earth Policy Institute. June 18, 2014. 2017-07-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-09-03 रोजी पाहिले.
  2. ^ "जपानमधील सौर ऊर्जा – सारांश". GENI. 7 May 2012 रोजी पाहिले.
  3. ^ Chisaki Watanabe (August 26, 2011). "अणुऊर्जेपासून दूर जाताना जपान अनुदान देऊन सौर, पवन ऊर्जा वाढवतो आहे". Bloomberg.
  4. ^ a b "Snapshot of Global Photovoltaic Markets 2017" (PDF). report. International Energy Agency. 19 April 2017. 27 April 2017 रोजी पाहिले.
  5. ^ Pv-magazine FEBRUARY 15, 2018. "Japan will likely install 6 GW to 7.5 GW (DC) of solar in 2018, from about 7 GW in 2017..."
  6. ^ Japan renews focus on solar power
  7. ^ Soto, Shigeru (2010-02-09). "Japan's Solar Panel Sales Rise to Record on Subsidy (Update1)". BusinessWeek. February 13, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-10 रोजी पाहिले.
  8. ^ "Japan Approves Feed-in Tariffs". 2014-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-11-16 रोजी पाहिले.
  9. ^ Japan’s High-Cost Renewable Energy Curbs Subsidy Impact
  10. ^ Chisaki Watanabe (March 2014). "Japan Cuts Subsidy for Solar Power, Boosts Offshore Wind". Bloomberg.com. Bloomberg News. 2014-04-02 रोजी पाहिले.
  11. ^ "Settlement of FY 2016 Purchase Prices and FY 2016 Surcharge Rates under the Feed-in Tariff Scheme for Renewable Energy(METI)". 2021-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-11-16 रोजी पाहिले.
  12. ^ a b "Japan to slash feed-in-tariffs for solar plants this year". AsianPower. 25 March 2018 रोजी पाहिले."Japan to slash feed-in-tariffs for solar plants this year". AsianPower. Retrieved 25 March 2018.

बाह्य दुवे