Jump to content

जपानचा इतिहास

जपानचा इतिहास

जपानचा इतिहास म्हणजे जपानची काही बेटे व तिथल्या लोकांचा प्राचीन काळापासून ते आजपर्यंतचा इतिहास होय. इ.स. पूर्व १२००० पासून (शेवटच्या हिमयुगानंतर) जपानी बेटांचा समूह मानवी वसाहतीसाठी अनुकूल बनला. जपानमध्ये सापडलेली सर्वात जुनी मातीची भांडी जोमोन कालखंडातील आहेत. जपानचा पहिला लिखित संदर्भ हा इ.स. १ ल्या शतकात चोवीस इतिहास या चिनी ऐतिहासिक दाखल्यामध्ये थोडक्यात आढळतो. जपानवर चीनचा मुख्य धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव असल्याचे समजते.

जपानची पहिली राजधानी नारा येथे इ.स. ७१० मध्ये स्थापित करण्यात आली; जी बौद्ध कला, धर्म व संस्कृतीचे केंद्र बनली.आजचे राजघराणे इ.स. ७०० च्या सुमारास उदयास आले. १८६८ पर्यंत त्यांना उच्च प्रतिष्ठा प्राप्त होती पण कमी राजकीय अधिकार व शक्ती होती. इ.स. १५५० पर्यंत राजकीय शक्ती हजारो छोट्या स्थानिक एककांत विभाजित झाली होती, ज्यावर स्थानिक डायम्यो (देव)चे वर्चस्व असे व प्रत्येक डायम्यो कडे सामुराई योद्ध्यांची फौज असे. इ.स. १६०० मध्ये तोकुगावा लेयासु सत्तेवर आला ज्याने आपल्या समर्थकांना जमिनी दिल्या व एदो (आताचे तोक्यो ) येथे बाकूफू (सरंजामशाही)ची रचना केली.तोकुगावाचा कालखंड भरभराटीचा व शांततेचा होता आणि जपानने ख्रिश्चन मिशनला संपुष्टात आणले आणि बाहेरील विश्वासोबतचे सर्व संबंध तोडले.

१८६० मध्ये मेईजी कालखंड चालू झाला आणि नवीन राष्ट्रीय नेतृत्वांनी पद्धतशीरपणे सरंजामशाही पद्धतीचा अंत केला आणि पश्चिमी आदर्शांना अनुसरून एका विरक्त, अविकसित बेटांच्या देशाला विश्व शक्तीचे स्वरूप प्रदान केले. जपानचे प्रबळ लष्कर पूर्णपणे स्वतंत्र नव्हते व त्यांनी १९२० व १९३० मध्ये मुलकी अधिकाऱ्यांचा विश्वासघात केला होता, ज्यामुळे लोकतंत्र अनिश्चित होते. १९३१ पासून जपानी लष्कर चीनमध्ये घुसले व १९३७ मध्ये चीनवर संपूर्ण शक्तीने व योजनाबद्ध पद्धतीने युद्ध घोषित केले. जपानने पूर्व चीनमधील मांचुरियाच्या महत्त्वाच्या शहरांचा ताबा घेऊन तेथे त्याच्या नियंत्रणाच्याखालील

कळसूत्री  सरकार स्थापन केले, परंतु तो चीनला पराभूत नाही करू शकला. डिसेंबर १९४१ मध्ये पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्यामुळे जपानचे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांशी युद्ध सुरू झाले. १९४२ च्या मध्यात जपानी आरमाराच्या विजयाच्या मालिकेमुळे त्यांचे लष्कर झपाट्याने वाढले व त्यांना जहाजे, युद्धसामग्री आणि तेलाचा पुरवठा कमी पडू लागला.जपानी सैन्याने हाँगकाँग हे दक्षिण चीनमधील  शहर तसेच सिंगापूर,मलेशिया,फिलीपाईन्स,तैवान,म्यानमार इत्यादी देश जिंकले. भारताच्या ईशान्य,पूर्व सीमेपर्यंत जपानी सैन्य येऊन पोचले. नंतर  जपानचे आरमार बुडले व त्याची महत्त्वाची शहरे हवेतून नष्ट करण्यात आली असताना देखील सम्राट शोवाने ऑगस्ट १९४५ पर्यंत लढा दिला, परंतु हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर दोन अणुबॉम्बच्या  हल्ल्यांच्यामुळे जपानला  शरण जाणे भाग पडले.

१९५५ नंतर जपानने उच्च आर्थिक वृद्धी दर गाठला व जगाचे आर्थिक शक्तिस्थान बनले; मुख्यतः अभियांत्रिकी (engineering), वाहन व इलेक्ट्रॉनिक्समध्ये १९९० पासून आर्थिक स्थैर्य हा जपानसाठी मोठा मुद्दा बनला आहे. २०११ मधील त्सुनामी व भूकंपामुळे मोठे आर्थिक नुकसान झालं आणि देशाच्या अणुशक्तीचे ही नुकसान झाले. १९६४ मध्ये सांतो एकीदा हे पंतप्रधान झाले जपानच्या भवितव्याचा विश्वास हा त्यांच्या धोरणाचा मुख्य आधार होता अमेरिकेशी घनिष्ठ मैत्री करून त्यांनी परराष्ट्र धोरणामध्ये अनेक नवे उपक्रम राबवले इतकेच नाही तर अमेरिकन तळ असलेल्या ओकिनावा बेटावर अमेरिका आपले नियंत्रण कमी करण्यास तयार नव्हता पण जपान मध्ये ओकिनावा बेटासाठी मोहीमच सुरू झाल्यामुळे अमेरिकेने ओकिनावा बद्दल संयुक्त समीक्षा करण्याची कबुली दिली १९६८ मध्ये अमेरिकेने उगाच वारा दोन्ही बेटे जपानला सोपवली १९६९मध्ये अमेरिकेने ओकिनावा भेट १९७२ पर्यंत जपानला देण्याचे आश्वासन दिले यामुळे १९७० मध्ये उभयपक्षी सुरक्षा आणि सहकार्याच्या कराराचे नूतनीकरण झाले. सांगतोने या राजकीय विजयाचे भांडवल करून निवडणुका घेतल्या व उदार लोकशाहीवादी पक्षाची शक्ती त्यांनी जपानमध्ये वाढवली.

जपानचा पूर्व इतिहास

अश्मयुग

जपानचे अश्मयुग इ.स. पूर्व ५०,००० ते इ.स. पूर्व १२,०००, शेवटच्या हिमयुगाच्या शेवटापर्यंत मानले जाते. अनेक इतिहासकार जपानच्या अश्मयुगाची सुरुवात इ.स. पूर्व ४०००० पासून मानतात. जपानी बेटांचा समूह मुख्य भूखंडापासून इ.स. पूर्व ११००० च्यासुमारास वेगळा झाला असावा. शिनइची फुजीमाराने फसवणूक केल्याचे आढळल्यानंतर पूर्व आणि मध्य अश्मयुगाची त्याने व त्याच्या सहकार्यांनी दिलेले पुरावे पुनर्संशोधनानंतर नाकारण्यात आली. त्यामुळे आता फक्त उत्तर अश्मयुगातील पुरावेच ( जे फुजीमाराने दिले नाही) शक्यतो सुस्थापित असल्याचे मानले जाऊ शकते.

प्राचीन जपान

जोमोन कालखंड

इ,स पूर्व १,४००ते इ,स पूर्व ३००चा कालखंड म्हणजे जोमोन कालखंड होय. मानवी संस्कृती व स्थिर जीवनशैलीची चिन्हे प्रथमतः जोमोन संस्कृतीसोबत इ.स. पूर्व १४००० च्या सुमारास दिसली. अर्ध-भटकी जीवनशैली, शिकार करून जगणे, पाण्यावरील लाकडीघरे व अविकसित शेती ही Jōmon कालखंडाची वैशिष्ट्ये होती. लोकं अजूनही वीणकाम शिकले नव्हते व जनावरांची कातडी किंवा लोकराचे कपडे म्हणून वापर करत नव्हते.जोमोन काळात लोकांनी मातीची भांडी बनवायला सुरुवात केली व सुशोभीकरणासाठी ती ओल्या मातीवर काठीने किंवा दोरीने नक्षीकाम करत होते. रेडिओ काबर्न डेटिंगच्या आधारे इ.स. पूर्व ११००० वर्षांपासूनची खंजीर, मौल्यवान खडे, शंख-शिंपल्यांपासून बनवलेले कंगवे आणि इतर घरेलू वस्तूंची काही जिवन्त उदाहरणे आजही जपानमध्ये सापडतात.

नुकतेच १९९८ मध्ये ओदाई यामामोतो येथे एका भांड्याचे काही तुकडे सापडले, जे इ.स. पूर्व १४,५०० मधील; म्हणजेच जपानमधील माहित असलेले सर्वांत जुने मातीचे भांडे असल्याचे समजते. काही जुन्या शोधांमध्ये शिकोकू मधील फुकुई गुहा १२००० ± ३५० आणि १२५०० ± ५०० BP (कामाकी & सेरीझावा १९६७), कामीकुरोईवा rock shelter १२, १६५ ± ३५० BP यांचासमावेश होतो. काही सुसज्ज मातीचे पुतळे, ज्यांना डोगू म्हणतात; जोमोन संस्कृतीच्या उत्तरार्धातील असल्याचे समजते.

यायोइ कालखंड

इ.स. पूर्व ४०० किंवा ३०० ते इ.स. २५० पर्यंतचा कालखंड म्हणजे यायोई कालखंड होय. हा कालखंड जोमोन कालखंडानंतरयेतो. या कालखंडाचे नाव यायोई शहरावरून पडले, जो बुंक्यो,तोक्यो शहरांचा एक भाग होता. यायोई कालखंडाच्या सुरुवातीला वीणकाम, तांदुळाची शेती आणि लोखंड व कांस्य धातू निर्मिती इत्यादींची सुरुवात झाली. लोखंड व कांस्य यायोई जपानमध्ये सोबतच आल्याचे समजते. लोखंडाचा वापर मुख्यतः शेती व इतर साधनांसाठी केला जाई, याउलट कांस्य हे धार्मिक विधींसाठी आणि सणांमध्ये वापरले जाई. या धातूंचे ओतकाम जपानमध्ये इ.स. पूर्व १०० च्या सुमारास चालू झाले, परंतु यासाठी लागणारा कच्चा माल आशिया खंडातून येत असे. जपानचा लिखित उल्लेख प्रथमतः इ.स. ५७ मध्ये चीनच्या Book of the Later Han मध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आला: " लेलांग समुद्रापलीकडे Waचे लोक राहतात. ते १०० पेक्षा जास्त जमातीचे असून वारंवार येतात आणि खंडणी भरतात." तसेच या पुस्तकानुसार वॉचा राजा सुईशो १०७ मध्ये सम्राट अन् ऑफ हान ला गुलामांची भेट देत असे. इ.स. ३ च्या शतकात लिहिलेल्या सांगूओ झी या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हा देश छोट्या-छोट्या ३० जमातींचा बनलेला असून हीमिको नावाची यामाताईकोकू येथील एक शॅमन राणी त्यावर राज्य करत असे.

क्युशु मधील योशीनोगारीची जागा ही पुराणवस्तूंच्या संशोधनासाठी अत्यंत प्रसिद्ध असून अनेक शतके सतत मानवी वास्तव्य असलेल्या मोठ्या वसाहतीला प्रदर्षित करते. उत्खननानुसार सर्वांत प्राचीन भाग हे इ.स. पूर्व ४०० च्या सुमाराचे असावेत. येथिल रहिवास्यांचे मुख्य भूमिसोबत सतत संपर्क आणि व्यापारी संबंध असल्याचे समजते. आज काही पुनर्रचित इमारती-पुराणसंशोधन उद्यानात पहायला मिळतात.

कोफून कालखंड

कोफुन कालखंडाची सुरुवात इ.स. २५० च्या सुमारास झाली व त्याचे नाव या काळात दिसायला सुरू झालेल्या मोठ्या दफनकेलेल्या मातीच्या ढिगा (कोफून) वरून पडले. या काळात भक्कम लष्करी राज्यांची स्थापना झाली. हे प्रत्येक राज्य एका प्रबळकुळवंशाशी केंद्रित झाले होते. इ.स. ३र्या ते ७व्या शतकात प्रबळ यामाटो या सुसंगठीत राज्यसंस्थेची स्थापना यामाटो व कवाची प्रांतात झाली, ज्याने जपानी सम्राटाच्या वंशाची स्थापना केली. इ.स. ५व्या शतकात जपानने चीनच्या सम्राटांना खंडणी पाठवायला सुरुवात केली. चीनच्या इतिहासात या राज्यसंस्थेला वॉ असे म्हणतात, ज्यात ५ राजांची नोंदणी केली गेली होती. या राजांनी चीनच्या नमुन्यावर आधारित एक केंद्रीय राज्यकारभार व्यवस्था व राजदरबार-न्यायपद्धती चालू केली. समाजाला वेगवेगळ्या व्यावसायिक गटांमध्ये विभाजित करण्यात आले होते. कोरियाची ३ राज्ये आणि जपानशी निकट संबंध या कालखंडाच्या मध्यात म्हणजेच इ.स. ४थ्या शतकाच्या शेवटी सुरू झाले.

परंपरागत जपान

प्राचीन जपान

Jōmon कालखंड :

इ,स पूर्व १,४००ते इ,स पूर्व ३००चा कालखंड म्हणजे Jōmon कालखंड होय. मानवी संस्कृती व स्थिर जीवनशैलीची चिन्हे प्रथमतः Jōmon संस्कृतीसोबत इ.स. पूर्व १४००० च्या सुमारास दिसली. अर्ध-भटकी जीवनशैली, शिकार करून जगणे, पाण्यावरील लाकडीघरे व अविकसित शेती ही Jōmon कालखंडाची वैशिष्ट्ये होती. लोकं अजूनही वीणकाम शिकले नव्हते व जनावरांची कातडी किंवा लोकराचे कपडे म्हणून वापर करत नव्हते. Jōmon काळात लोकांनी मातीची भांडी बनवायला सुरुवात केली व सुशोभीकरणासाठी ती ओल्या मातीवर काठीने किंवा दोरीने नक्षीकाम करत होते. radio-carbon datingच्या आधारे इ.स. पूर्व ११००० वर्षांपासूनची खंजीर, मौल्यवान खडे, शंख-शिंपल्यांपासून बनवलेले कंगवे आणि इतर घरेलू वस्तूंची काही जिवन्त उदाहरणे आजही जपानमध्ये सापडतात.

असुका कालखंड

असुका कालखंडात (५३८ ते ७१०) जपानी राज्यसंस्थेचे संपूर्ण केंद्रीकरण करून Taika Reforms आणि Taihō Code सारखे कायदे संमत केले गेले. याच कालखंडात जपानने कोरियन द्विपकल्पाच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर राहणाऱ्या Paikche किंवा Baekje लोकांशी मजबूत आर्थिक संबंध स्थापित केले. जपानमध्ये बौद्ध धर्म Baekje लोकांनी आणला, ज्यांना जपानने लष्करी मदतकरणे चालू ठेवले होते. जपानमध्ये बौद्ध धर्माला सत्ताधारी वर्गाने प्रोत्साहन दिले. सुरुवातीला जपानच्या सामान्य नागरिकांत बौद्ध धर्म जास्त लोकप्रिय नव्हता. परंतु बौद्ध धर्माच्या आगमनामुळे आजारी लोकांना मोठ्या kofun मध्ये दफन करण्याची प्रथा बंद झाली.

५९३ मध्ये सम्राट Sujunची हत्या झाल्यानंतर त्याची भाची सम्राज्ञी सुईको सत्तेवर आली. तिने सम्राट Bidatsu (५७२-५८५) शी विवाह केला. ती जपानची पहिली स्त्री राज्यकर्ती ठरली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या राजकुमार Shōtoku ने जपानमध्ये बौद्ध धर्म आणि चीनच्या संस्कृतीचा प्रसार करण्यावर जोर दिला. Seventeen-article constitution (सतरा लेखी संविधानाद्वारे) जपानमध्ये शांती स्थापित करण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते. आता बौद्ध धर्म जपानी संस्कृतीचा शाश्वत भाग झाला होता.

नुकतेच १९९८ मध्ये Odai Yamamoto I येथे एका भांड्याचे काही तुकडे सापडले, जे इ.स. पूर्व १४,५०० मधील; म्हणजेच जपानमधील माहित असलेले सर्वांत जुने मातीचे भांडे असल्याचे समजते. काही जुन्या शोधांमध्ये Shikoku मधील Fukui गुहा १२००० ± ३५० आणि १२५०० ± ५०० BP (Kamaki & Serizawa १९६७), Kamikuroiwa rock shelter १२, १६५ ± ३५० BP यांचासमावेश होतो. काही सुसज्ज मातीचे पुतळे, ज्यांना dogū म्हणतात; Jōmon संस्कृतीच्या उत्तरार्धातील असल्याचे समजते.

Yayoi कालखंड:

इ.स. पूर्व ४०० किंवा ३०० ते इ.स. २५० पर्यंतचा कालखंड म्हणजे Yayoi कालखंड होय. हा कालखंड Jōmon कालखंडानंतर येतो. या कालखंडाचे नाव Yayoi शहरावरून पडले, जो Bunkyō, Tokyo शहरांचा एक भाग होता। Yayoi कालखंडाच्या सुरुवातीला वीणकाम, तांदुळाची शेती आणि लोखंड व कांस्य धातू निर्मिती इत्यादींची सुरुवात झाली. लोखंड व कांस्य Yayoi जपानमध्ये सोबतच आल्याचे समजते. लोखंडाचा वापर मुख्यतः शेती व इतर साधनांसाठी केला जाई, याउलट कांस्य हे धार्मिक विधींसाठी आणि सणांमध्ये वापरले जाई. या धातूंचे ओतकाम जपानमध्ये इ.स. पूर्व १०० च्या सुमारास चालू झाले, परंतु यासाठी लागणारा कच्चा माल आशिया (Asia) खंडातून येत असे. जपानचा लिखित उल्लेख प्रथमतः इ.स. ५७ मध्ये चीनच्या Book of the Later Han मध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आला: " Lelang समुद्रापलीकडे Waचे लोक राहतात. ते १०० पेक्षा जास्त जमातीचे असून वारंवार येतात आणि खंडणी भरतात." तसेच या पुस्तकानुसार Waचा राजा Suishō १०७ मध्ये सम्राट An of Hanला गुलामांची भेट देत असे. इ.स. ३ च्या शतकात लिहिलेल्या Sanguo Zhi या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हा देश छोट्या-छोट्या ३० जमातींचा बनलेला असून Himiko नावाची Yamataikoku येथील एक shaman राणी त्यावर राज्य करत असे.

क्युश्यूमधील योशिनोगारीची जागा ही पुराणवस्तूंच्या संशोधनासाठी अत्यंत प्रसिद्ध असून अनेक शतके सतत मानवी वास्तव्य असलेल्या मोठ्या वसाहतीला प्रदर्शित करते. उत्खननानुसार सर्वांत प्राचीन भाग हे इ.स. पूर्व ४०० च्या सुमाराचे असावेत. येथिल रहिवास्यांचे मुख्य भूमिसोबत सतत संपर्क आणि व्यापारी संबंध असल्याचे समजते. आज काही पुनर्रचित इमारती-पुराणसंशोधन उद्यानात पहायला मिळतात.

Kofun कालखंड:

Kofun कालखंडाची सुरुवात इ.स. २५० च्या सुमारास झाली व त्याचे नाव या काळात दिसायला सुरू झालेल्या मोठ्या दफनकेलेल्या मातीच्या ढिगा (Kofun)वरून पडले. या काळात भक्कम लष्करी राज्यांची स्थापना झाली. हे प्रत्येक राज्य एका प्रबळकुळवंशाशी केंद्रित झाले होते. इ.स. ३र्या ते ७व्या शतकात प्रबळ Yamato या सुसंगठीत राज्यसंस्थेची स्थापना Yamato व Kawachi प्रांतात झाली, ज्याने जपानी सम्राटाच्या वंशाची (Japanese imperial lineage) स्थापना केली. इ.स. ५व्या शतकात जपानने चीनच्या सम्राटांना खंडणी पाठवायला सुरुवात केली. चीनच्या इतिहासात या राज्यसंस्थेला Wa असे म्हणतात, ज्यात ५ राजांची नोंदणी केली गेली होती. या राजांनी चीनच्या नमुन्यावर आधारित एक केंद्रीय राज्यकारभार व्यवस्था व राजदरबार-न्यायपद्धती चालू केली. समाजाला वेगवेगळ्या व्यावसायिक गटांमध्ये विभाजित करण्यात आले होते. कोरियाची ३ राज्ये आणि जपानशी निकट संबंध या कालखंडाच्या मध्यात म्हणजेच इ.स. ४थ्या शतकाच्या शेवटी सुरू झाले.

3 Classical जपान

Asuka कालखंड:

Asuka कालखंडात (५३८ ते ७१०) जपानी राज्यसंस्थेचे संपूर्ण केंद्रीकरण करून Taika Reforms आणि Taihō Code सारखे कायदे संमत केले गेले. याच कालखंडात जपानने कोरियन द्विपकल्पाच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावर राहणाऱ्या Paikche किंवा Baekje लोकांशी मजबूत आर्थिक संबंध स्थापित केले. जपानमध्ये बौद्ध धर्म Baekje लोकांनी आणला, ज्यांना जपानने लष्करी मदतकरणे चालू ठेवले होते. जपानमध्ये बौद्ध धर्माला सत्ताधारी वर्गाने प्रोत्साहन दिले. सुरुवातीला जपानच्या सामान्य नागरिकांत बौद्ध धर्म जास्त लोकप्रिय नव्हता. परंतु बौद्ध धर्माच्या आगमनामुळे आजारी लोकांना मोठ्या kofun मध्ये दफन करण्याची प्रथा बंद झाली.

५९३ मध्ये सम्राट Sujunची हत्या झाल्यानंतर त्याची भाची सम्राद्णी Suiko सत्तेवर आली. तीने सम्राट Bidatsu (५७२-५८५) शी विवाह केला. ती जपानची पहिली स्त्री राज्यकर्ती ठरली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या राजकुमार Shōtoku ने जपानमध्ये बौद्ध धर्म आणि चीनच्या संस्कृतीचा प्रसार करण्यावर जोर दिला. Seventeen-article constitution (सतरा लेखी संविधानाद्वारे) जपानमध्ये शांती स्थापित करण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते. आता बौद्ध धर्म जपानी संस्कृतीचा शाश्वत भाग झाला होता.

Nara कालखंड:

८ व्या शतकाचा Nara कालखंड हा सामर्थ्यवान जपानी राज्याचा उदय मानला जातो. तसेच तो जपानचे सोनेरी युग म्हणूनओळखला जातो. ७१० मध्ये जपानची राजधानी Asuka वरून Nara येथे हलवण्यात आली. नवीन सरकारने कायदेशिररित्या सर्वपारंपारिक, राजकिय आणि आर्थिक व्यवहार सुसंगठीत केले. जमिनीची पाहणी करून नोंद करण्यात आली. एका उत्तम आणि प्रबळसरकारचा उदय झाला होता. सरकारी कार्यालये, मंदिरे, रस्ते बांधकाम आणि जलसिंचन पद्धतीत सुधार इत्यादी अनेक मोठी कामेसरकारने केली. जमिन उपयोग आणि कराची नवी पद्धती ग्रामीण भागात जमिन मालकी प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली .प्रत्येकी एक एकर अशी जमिनीची विभागणी करण्यात आली. प्रत्येक ५ वर्षांनंतर जनगणनेवेळी या विभागणीचे सर्वेक्षण केले जात असे. हा काळ देशाच्या सांस्कृतिक भरभराटीचा होता. ७१० मध्ये सम्राद्नी Gemmeiच्या आदेशानुसार राजधानी Heijō-kyō (आजचा Nara) करण्यात आली. ७८४ मध्ये पुन्हा राजधानी Nagaoka-kyō कडे आणि ७९४ मध्ये Heian-kyō (आताचे Kyōto ) कडेवळवण्यात आली. जपानमध्ये ८ व्या शतकात , the Kojiki (The Record of Ancient Matters, 712) आणि Nihon Shoki(Chronicles of Japan, 720) सारख्या मोठमोठ्या लेखनासोबत इतिहासलेखन उच्च शिखरावर पोहोचले. Nara कालखंडापासुन राजकीय शक्ती सम्राटाच्या हातात राहीली नाही व काळानुसार ती उच्च न्यायाधिकारी, लष्करी नेते आणि आता जपानच्यापंतप्रधानाच्या हाती बदलत गेली. Heian कालखंड:

७९४ ते ११८५चा कालखंड म्हणजे Heian कालखंड होय. या कालखंडात जपानने कलेत; मुख्यतः काव्य आणि साहित्यातउच्च शिखर गाठले. ११ व्या शतकात Lady Shikibu Murasaki ने जपानची सर्वांत जुनी कादंबरी The Tale of Genji लिहिली.जपानची सर्वांत जुनी अस्तित्वात असलेली काव्ये Man'yōshū व Kokin Wakashū याच काळात लिहिली गेली. Tang राजवटीच्याऱ्हासामुळे चीनचा प्रभाव वाढत गेला व नंतर संपुष्टात आला, परंतु चीनशी व्यापार आणि बौद्ध यात्रा करणे सुरूच राहीले.

राजदरबारात राजकिय शक्ती ही शक्तीशाली कुलीन घराण्यांच्या हाती असे मुख्यतः Fujiwara वंशाच्या. Fujiwara वंशानेराजघराण्यावर जवळजवळ संपूर्ण ताबा मिळवला होता. ८५८ ते ११६० या Fujiwaraचे वर्चस्व असणाऱ्या कालखंडाला Fujiwara कालखंडाच्या नावाने ओळखले जाते. जेव्हा लोकांमध्ये सरकारविषयी असंतोष निर्माण झाला व त्यांनी Hogen Rebellion (1156-1158), the Heiji Rebellion (1160) आणि Gempei War सारखे विद्रोह केले, तेव्हा जनतेने Fujiwara वंश व राजघराणे दोघांनाहीलक्ष्य बनवले. Yoritomo ने उत्तर जपानमध्ये युद्धात पराभव केल्यासोबतच Fujiwara कालखंडाचा व Fujiwara वंशाच्या सरकारवरील वर्चस्वाचा अंत झाला.

या कालखंडाच्या शेवटी अनेक लष्करी वंशांचा उदय झाला. ज्यापैकी Minamoto ,Taira, Fujiwara , Tachibana हे सर्वांतशक्तीशाली वंश होते. या वंशांतील आपसी संघर्षांनी १२ व्या शतकाशेवटी युद्धाचे रूप धारण केले, जसे की Hōgen (1156-1158), Heiji (११६०) , Genpei युद्ध . शेवटी Shogunच्या राजकिय अधिपत्याखाली samurai वर्गाचा उदय झाला व जपानमध्ये सरंजामशाहीचीसुरुवात झाली.

या कालखंडात बौद्ध धर्माचा झपाट्याने प्रसार झाला. बौद्ध धर्म दोन संप्रदयात विभाजित झाला होता. Tendai पंथ जोचीनमधून Saichō ने आणला आणि Shingon पंथ जो चीनमधून Kūkai ने आणला. Tendai पंथाने उंच डोंगरावर monasteriesकिंवा मंदिरे बांधली. याउलट Shingon पंथ तत्त्वद्ण्यानापेक्षा जास्त व्यावहारिक होता. तसेच जास्त्‌ लोकप्रियही होता. या दोघांपेक्षासोपा असलेला Pure Land Buddhism हा बौद्ध धर्म ११ व्या शतकात खूप लोकप्रिय ठरला.

4 Feudal जपान

Feudal कालखंड शक्तीशाली स्थानिक परिवार (Daimyo) आणि लष्करी सेनापतीच्या (Shogun) वर्चस्वाचा काळ होय.

Kamakura कालखंड:

Kamakura shogunateच्या हुकुमतीचा ११८५ ते १३३३चा कालखंड Kamakura कालखंड म्हणून ओळखला जातो. दिवाणी, लष्करी व न्यायिक मामल्यावर bushi (samurai) वर्गाचे नियंत्रण होते, ज्यांत सर्वांत शक्तिशाली de facto (एक Shogun ) होता. ११८५ मध्ये Minamoto no Yoritomo आणि त्याचा छोटा भाऊ Yoshitsune यांनी Dan-no-uraच्या नाविक युद्धात Taira वंशाचा पराभव केला. परिणामे योद्धा (samurai) वर्गाचा उदय झाला. samurai वर्गाची सम्राटावर निष्ठा असे व तो सम्राटाला लष्करी मदत करत असे. कधी-कधी या samurai वर्गाचे आपापसांतही युद्ध होत असे, ज्याचा जनतेला त्रास सहन करावा लागे. या कालखंडात राजदरबार राजधानी Kyoto मध्ये होता. परंतु Yoritomo हा Kamakura येथून राज्य करणारा पहिला Shogun बनला. Yoritomoच्या मृत्यू नंतर दुसरा लष्करी वंश Hōjō राज्यकर्ता बनला.

याच काळात १२७४ आणि १२८१ मध्ये जपानवर Mongol सेनेने मोठे हल्ले चढवले. त्यांच्याकडे उच्च नाविक तंत्रद्ण्यान व विकसित हत्यारे होती. परंतु दोन्हीवेळी प्रसिद्ध kamikaze चक्रीवादळाने जपानला वाचवले. जरी जपान Mongol हल्ले परतवण्यात सफल झाला होता, तरीही जनतेच्या मनात भीती निर्माण झाली होती. संभावित तिसऱ्या हल्ल्यापासून संरक्षणाच्या तयारीवर केलेल्याअमाप खर्चामुळे जपानची अर्थव्यवस्था बिघडली, परिणामे Kamakura वंशाचा अंत झाला.

Kemmu Restoration (पुनःस्थापना ):

१३३३ मध्ये सम्राट Go-Daigo आणि त्याच्या अनुया यांद्वारे चढवलेल्या हल्ल्यामुळे Kamakura shogunateचा अंत झाला. याला Kemmu Restorationच्या नावाने ओळखले जाते. Kamakura काळातील लष्करी सरकारची जागा मुलकी सरकारने घेतली. परंतु हे जास्त काळ टिकले नाही व यामुळे लष्करी वर्गात प्रचंड गलबला निर्माण झाला. सम्राट Go-Daigo ने स्थलांतरित केलेल्या Ashikaga Tadayoshi ने लष्कर वर्गाला सोबत घेऊन मुलकी सरकारविरोधात बंड पुकारले आणि Minatogawaच्या युद्धात Go-Daigoच्या सैन्याचा पराभव केला व Ashikaga वंश आणि लष्कर Kamakura वरून Kyoto कडे स्थलांतरित झाले. १३३८ मध्ये सम्राटाने औपचारिक रित्या Ashikaga Tadayoshiला Shogun घोषित केले व Kemmu Restorationचा अंत होऊन Ashikaga shogunateची सुरुवात झाली. जपानच्या तिन्ही सम्राटांच्या पदत्यागानंतर वारसाहक्काचे युद्ध संपले.

Muromachi कालखंड:

या काळात Ashikaga shogunate ने १३३६ ते १५७३ ही २७३ वर्षे राज्य केले. १३३६ मध्ये Ashikaga वंशाने Kyotoला स्वतःची राजधानी बनवली. या कालखंडाच्या वर्षे (१३३६-१३९२) राजसत्तेचे दोन भागात विभाजन झाल्यामुळे Nanboku-chō कालखंडम्हणून ओळखली जातात. १३९२ मध्ये Northern court आणि southern Court एकत्र आले आणि सम्राट Kogon नवीन सम्राट बनला. जरी Ashikaga Bakufu आणि Kamakura Bakufuच्या कायद्यांत जास्त फरक नव्हता; Ashikaga shogunateचा Kamakura shogunate पेक्षा सम्राटावर जास्त दबदबा होता. परंतु Ashikaga shogunateला स्थानिक सेनापतींवर नियंत्रण ठेवणे जमले नाही. १३६८ मध्ये Ming राजवंशाने Yuan राजवंशाची जागा घेतली व चीनचे जपानशी थांबलेले व्यापारी संबंध पुन्हा सुरू झाले व जपानमध्ये Zen बौद्ध धर्म आला, ज्याने राज्यकर्त्या वर्गावर मोठा प्रभाव टाकला. १५७३ मध्ये Oda Nobunaga द्वारे १५व्या आणि शेवटच्या Shogun Ashikaga Yoshiakiला Kyoto मधून बाहेर काढण्यासोबत या कालखंडाचा शेवट झाला.

Sengoku कालखंड:

Muromachi कालखंडाच्या शेवटचा कालखंड ( १४६७ ते १५७३ ) Sengoku कालखंड म्हणून ओळखला जातो. हा कालखंडआपसी कलह आणि Portuguese "Nanban" व्यापाऱ्याशी प्रथम संपर्काचा काळ होता. नंतरच्या काळात नेदरलंड ,इंग्लंड आणि स्पेनचेव्यापारी आले व त्यासोबतच Jesuit ,Dominican व Franciscan मिशनरींचेही आगमण झाले.

Azuchi-Momoyama कालखंड:

अंदाजे १५६८ ते १६०३ पर्यंतचा हा कालखंड लष्करी एकीकरण व एकाच राजकीय नेतृत्वाखाली देशाचे स्थैर्य यांसाठी ओळखला जातो. Oda Nobunaga याने बौद्ध भिक्षूंची कत्तल करून ख्रिश्चन धर्माला संरक्षण दिले. १५८२ च्या बंडामध्ये त्याची हत्या करण्यात आली. शेवटी Toyotomi Hideyoshi या Nobunagaच्या सेनापतीने जपानचे एकीकरण घडवून आणले त्याने कोरिया व चीनवर स्वारी करून साम्राज्य विस्ताराचा प्रयत्न केला, परंतु यात त्याला यश मिळाले नाही.

ख्रिश्चन मिशन :

Francis Xavierच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन मशनरींचे १५४९ मध्ये Kyoto मध्ये आगमन झाले. अनेक Daimyoनी ख्रिश्चनधर्म स्वीकारला. १५८७ मध्ये Hideyoshiला वाटले की ख्रिश्चन धर्मांमुळे जपानचे विभाजन होईल व पश्चिमी देश याचा फायदा घेऊन अतिक्रमण करतील. यामुळे ख्रिश्चन मिशनरींवर बंदी घालण्यात आली. ख्रिश्चन चर्च आणि शाळा पाडण्यात आल्या आणि Daimyoच्या ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली व ज्यांनी ख्रिश्चन धर्म नाही सोडला त्यांची कत्तल करण्यात आली. १६२० पर्यंत ख्रिश्चन धर्म जपानमधून पूर्णतः नष्ट झाला होता.

5 Edo ("Tokugawa") कालखंड (१६०३-१८६८)

या कालखंडात राजसत्ता Edo किंवा Tokugawa वंशाच्या हाती राहीली. त्यांनी धर्मावर नियंत्रण मिळवले. अर्थव्यवस्थेला योग्य दिशा दिली आणि कराची व सरकारी खर्चाची समान पद्धती चालू केली. त्यांनी युद्ध टाळून देशात शांतीचे व भरभराटीचे वातावरण निर्माण केले.

अर्थव्यवस्था :

८० % लोक भाताची शेती करत होते. भात उत्पादनात सतत वाढ होत गेली, परंतु लोकसंख्येत वाढ न झाल्याने देशात भरभराट आली. Edo व Osaka मध्ये भाताच्या मोठ्या बाजारपेठा निर्माण झाल्या. व्यापारी व कारागीर वर्गाने पैसे, चलन देवाणघेवाणीच्या नव्या पद्धतीचा शोध लावला ज्याने उद्योजक वर्गाला प्रोत्साहन मिळाले. samurai वर्गाला शेती किंवा व्यापार करण्यापासून निषिद्ध करण्यात आले होते, परंतु त्यांना कर्ज काढण्याची मुभा देण्यात आली. Bakufu आणि Daimyo ने व्यापारावर कर लावला नाही. परिणामे कर्जापासून वाचण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांवरील करात वाढ केली. Samurai वर्गाची परिस्थिती कर्जामुळे खराब होऊन त्यांना गरिबीचा सामना करावा लागला.

१८०० मध्ये व्यापारीकरण वाढले व दुरदुरची खेडी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी जोडली गेली. श्रीमंत शेतकरी भात सोडून इतर व्यावसाहिक पिकान्कडे वळले, तसेच त्यांनी स्थानिक लोकांना कर्ज देणे, व्यापार इत्यादी सुरू केले. Chōshū आणि Satsuma सारखे काही प्रदेश सोडून इतर अनेक प्रदेश कर्जात बुडाले.

समाजरचना :

जपानी समाजरचनेत सर्वांत वर सम्राट आणि इतर राजदरबारी मंडळी होती, ज्यांच्याकडे उच्च प्रतिष्ठा पण कमी राजकीय शक्ती होती. त्यानंतर Shogunचे "bushi", Daimyo आणि जहागीरदारांचा वर्ग होता, ज्यांच्याकडे राजकीय शक्ती होती.

samurai वर्ग :

यानंतर समाजरचनेत ४०,००० योद्ध्यांचा क्रमांक असे ज्यांना samurai म्हणले जायचे. फक्त मोजकेच samurai उच्च दर्जाचे होते व इतर सर्व कमी दर्जाची किरकोळ कामे करणारे सैनिक होते. Shogun कडे १७,००० तर Daimyo कडे प्रत्येकी १०० samurai सेवक होते. बहुतांश samurai साध्या घरात राहात होते.

कनिष्ठ वर्गे :

कनिष्ठ वर्गाचे दोन मुख्य भाग होते. गरीब शेतकरी - जे एकूण लोकसंख्येच्या ८० % होते व इतर गावमंडळी. सर्व प्रकारची करे त्यानांच भरावी लागत असे. ते अशिक्षित होते व छोट्या गावांत राहायचे.

व्यापारी आणि कारागीर वर्ग :

हा वर्ग प्रतिष्ठेच्या बाबतीत कमी पण धन आणि जीवनशैलीच्या बाबतीत खूप उंच होता. व्यापारी आणि कारागीर मुख्यतः शहरात राहत असत, परंतु त्यांच्याकडे अजिबात राजकीय शक्ती नव्हती.

साक्षरता :

शिक्षणाला जपानी समाजात जास्त प्राधान्य दिले जायाचे, परंतु शिक्षण हे लेखनपद्धतीमुळे अवघड होते. अनेक शतके Wood block छपाई ही आदर्श छपाई पद्धत होती. १५०० नंतर movable type छपाई यंत्राचा प्रयोग करण्यात आली. १७८० पर्यंत जपानमध्ये दरवर्षी ३००० पुस्तकांची छपाई होत असे( जिथे रशियामध्ये ४०० पुस्तकांची छपाई ). १८६० पर्यंत ग्रामीण भागात ४० % पुरुष व १० % महिला शिक्षित होत्या. Edo (Tokyo) मध्ये तर साक्षरतेचे प्रमाण ८० % होते. १८७१ पासून सर्वांसाठी शिक्षण सक्तीचे करण्यात आले.

सरकार : Edo कालखंडात देशाचा राज्यकाराभार Tokugawa shogunateचे नियंत्रण असणाऱ्या जवळपास २०० Daimyo मध्ये विभाग केला होता. Tokugawa वंशाने आपल्या १५ पिढ्यांपर्यंतच्या कालखंडात Edo (Tokyo) येथून राज्यकारभार केला. त्यांनी अनेक महत्त्वाची धोरणे आखली. त्यांनी samurai वर्गाला शेतकरी, व्यापारी व कारागीर वर्गांच्या वरचा दर्जा दिला. केसरचना, पेहराव यांसारख्या खाजगी गोष्टींवरील प्रतिबंध त्यांनी हटवले. तसेच Daimyo वर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक नवीन पद्धती लागू केल्या. हा २६५ वर्षांचा कालखंड शांततेचा कालखंड म्हणून ओळखला जातो.

Sakoku-seclusion बाहेरच्या जगापसून : १७ व्या शतकाच्या सुरुवातीला shogunateला संशय आला की विदेशी व्यापारी आणि मिशनरीनंतर पश्चिमी शक्ती जपानवर लष्करी विजय मिळवतील. परिणामी संशयित ३०,००० ख्रिश्चन आणि १,००,००० सरकारी सामुराई यांच्यात जी लढाई झाली ती Shimabaraचे बंड म्हणून ओळखली जाते. या बंडाला परतवून लावल्यानंतर सरकारने विदेशी लोकांच्या आगमनावर अनेक निर्बंध लादले. डच आणि चीनी व्यापाऱ्यांना काही भागावर व्यापाराची अनुमती दिली, परंतु इतर सर्व विदेशी लोकांच्या आगमनावर बंदी घालण्यात आली. Seclusionचा अंत : २०० वर्षांपर्यंत जपान जगापासून विरक्त राहिले. १८४४ मध्ये नेदरलंडच्या William II (विल्यम २) ने जपानला त्यांच्यासाठी दरवाजे उघडण्याचा संदेश पाठवला, जो जपानने नाकारला. १८५३ मध्ये कमांडर Matthew Perry आणि अमेरीकन आरमारांच्या ४ युद्धनौका Yokohamaच्या खाडीत शिरल्या आणि त्यानेजपानला पश्चिमी राष्ट्रांशी व्यापारासाठी विनंती केली. १८५४ मध्ये Perry ७ युद्धनौकांसोबत परतला व जपानला शांती व मैत्री करारावर हस्ताक्षर करण्याची मागणी केली. यानंतर अनेक पश्चिमी देशांनी जपानशी असे करार करून जपानचे पश्चिमी देशांशी संबंध वाढवले. 6 जपानचे साम्राज्य (१८६८-१९४५) १८६८ पासून जपानचे एकीकरण आणि केंद्रीकरण होऊन जपानी साम्राज्याचा उदय झाला. हा ७७ वर्षाचा कालखंड जपानच्या जलद आर्थिक वृद्धीचा काळ होता. जपान एक साम्राज्यवादी सत्ता बनला, तसेच त्याने कोरिया व तैवान मध्ये वसाहती स्थापित केल्या. अमेरीकेशी वाढता तणाव व जपानच्या तेलपुरवठ्यावर असलेले पश्चिमी देशांचे नियंत्रण यामुळे दुसरे महायुद्ध घडले. जपानने डच आणि ब्रिटिश प्रदेशांवर अनेक हल्ले चढवले. अमेरीकेने जपानच्या ५० पेक्षा जास्त महत्त्वाच्या शहरांवर हवाई हल्ले चढवले, ज्यांत हिरोशिमा आणि नागासाकी वरील अणुबांब (Atom बॉम्ब) हल्लेही समाविष्ट आहेत. यानंतर जपानने शरणागती पत्करली आणि चीन, कोरिया, तैवान व इतर ठिकाणावरून आपली हुकूमत हटवली आणि जपान एक लोकतांत्रिक देश बनला. Meiji Restoration : पश्चिमी देशांशी स्थापित नवीन संबंधांमुळे; मुख्यत: जपानच्या लष्करी आक्रमकतेमुळे पश्चिमी देशांशी करारावर हस्ताक्षर करणे देशासाठी लाजिरवाणी बाब मानली जावू लागली. Tokugawa shōgunला राजिनामा देण्यास मजबूर करण्यात आले. १८६८ नंतरच्या Boshin युद्धानंतर सम्राट पुन्हा राजसत्तेवर आला आणि तीव्र राष्ट्रवाद व सामाजिक-आर्थिक पुनर्रचनेची सुरुवात झाली, ज्याला Meiji Restoration म्हणतात. आर्थिक आधुनिकीकरण : जपानच्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात १८७० पासून झाली. सरकारने रेल्वे मार्ग व रस्त्यांचा विकास केला. कापड उद्योग; मुख्यतः कापूस आणि रेशीम उद्योग आधुनिक उद्योगाच्या रूपात समोर आले. सरकारने पश्चिमी शिक्षणशैलीला महत्त्व देऊन हजारो विद्यार्थ्यांना पश्चिमी देशांत शिक्षणासाठी पाठवले व ३००० पेक्षा जास्त पश्चिमी शिक्षकांना जपानमध्ये गणित, विज्ञान, तन्त्रज्ञान व विदेशी भाषा शिकवण्यासाठी बोलावले. १८७७ मध्ये स्थापित Bank of Japan ने आपल्या कराचा वापर स्टील व कपडा उद्योगाला कर्ज देण्यासाठी केला. चीन व रशियाशी युद्ध : चीनशी झालेल्या युद्धाने जपानला पुर्वेकडिल महान शक्ती बनवले व रशियाशी झालेल्या युद्धाने पुर्वेकडिल देश पश्चिमी शक्तींना हरवू शकतात हे दाखवून दिले. यानंतर जपान पुर्वेकडील प्रबळ सत्ता म्हणून समोर आला. पश्चिमी देशांशी औद्योगिक आणि लष्करी बाबतींत स्पर्धा करण्याच्या ध्येयाने व विश्वासाने जपानला नवीन विश्व शक्ती बनवली.

प्रथम विश्व युद्ध : जपान आणि ब्रिटनमध्ये १९०२ मध्ये Anglo-Japanese एकत्रीकरण करार झाला, जो १९२३ला संपला. हा करार दोन्ही देशांमध्ये लष्करी मदतीसाठी केला गेला, ज्यामुळे रशिया व जर्मनीला धोकानिर्माण झाला. जपान प्रथम विश्व युद्धामध्ये ब्रिटनच्या बाजुने उतरले. त्यांचे काम फक्त जर्मन सैनिकी छावण्यांना पूर्व आशियात आणि प्रशांत महासागरात येण्यापासून रोखणे होते. जपानने या संधीचा फायदा आशियावर आपला प्रभाव वाढवण्यावर आणि प्रशांत महासागरात आपली मालकी वाढवण्यासाठी घेतला. १९१९ मध्ये जपान Versailles मध्ये झालेल्या शांती संमेलनात गेला, जिथे त्याचे नाव सर्वोच्च ५ देशांत घेण्यात आले. प्रथम विश्वयुद्धानंतर जपान एक संपन्न देश बनला. जपानमध्ये समाजसत्तावाद : १९१० ते १९२० या काळात जपानने लोकतंत्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली, ज्याला "Taishō प्रजासत्ताक" नावाने ओळखले जाते. परंतु संसदीय प्रणाली १९२० ते १९३० दरम्यानचा राजकीय आणि आर्थिक दबाव सहन करु शकली नाही व देशावर लष्कराने नियंत्रण मिळवले. हे सत्तापरिवर्तन Meiji संविधानाचा परिणाम होते, ज्यानुसार कायदेमंडळ जनतेला जबाबदार नसून फक्त सम्राटाला जबाबदार होते. पक्षराजनीती देशाचे तुकडे करणारी व लालची प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारी मानली जाऊ लागल्यामुळे सर्व मोठे राजकीय पक्ष एकत्रित झाले व त्यांनी Imperial Rule Assistance Association (IRAA) हासंगठीत पक्ष बनवला.

दुसरे विश्वयुद्ध : अमेरिका चीनला धन, लष्कर व इतर मदत करत असे. जपानची चीनवरील आक्रमणे, Nanjing हत्याकांडासारखी दुष्कृत्ये, यामुळे जपान व अमेरिकेमध्ये तणाव वाढत गेला. २५ जुलै १९४१ मध्ये अमेरिकेतील सर्व जपानी मालमत्ता गोठवण्यात आली. जपानी पंतप्रधान Konoe Fumimaro समवेत अनेक पुढार्यांना वाटत होते की अमेरिकेशी युद्धात नक्कीच हार पत्कारावी लागणार, परंतु अमेरिकेने मागितलेल्या सवलतींमुळे जपान विश्व शक्ती राहणार नाही व पश्चिमी देशांच्या हुकुमतीचा शिकार होईल. नंतर जपानने काही आर्थिक तडजोड करण्याची तयारी दाखवली, जी अमेरिकेने नाकारली. Osami Nagano, Kotohito Kan'in, Hajime, Sugiyama आणि Hideki Tōjō यांसारख्या लष्करी नेत्यांना पश्चिमी राष्ट्रांशी युद्ध अटळ वाटले. शेवटी नोव्हेंबर १९४१ मध्ये त्यांनी अमेरिकेवर हल्ल्यासाठी सम्राटाची मंजूरी मिळवून घेतली. अमेरिकेला जपानी हल्ला फिलीपिन्स (Philippines) वर अपेक्षित होता, परंतु Yamamotoच्या सल्ल्यावरून जपानने Hawaii येथिल पर्ल हार्बर (Pearl Harbor) या प्रमुख हवाई अड्ड्यावर हल्लाकरण्याचा निर्णय घेतला. पर्ल हार्बर वरील हल्ल्याने अमेरीकेला थोडा काळ कमजोर बनवले, परंतु यामुळे जपान अमेरीकेला पूर्णतः हतबल करू शकले नाही. याचवेळी जपानी लष्कराने ब्रिटिश Hong Kong वर हल्ला चढवला व त्याला जवळपास ४ वर्षे आपल्या ताब्यात ठेवले. जपानी लष्कराने चीनच्या किनारपट्टीवर हल्ला चढवून शांघाई सारख्या अनेक प्रमुख शहरांवर ताबा मिळवला. फ्रेंच इण्डोचाइना (वियतनाम, लाओस, कंबोडिया), ब्रिटिश मलाया (ब्रूनी, मलेशिया, सिंगापूर ) तसेच डचपूर्व-इण्डिज (इंडोनेशिया) वर जपानने आपले अधिपत्य स्थापित केले. जपानने बर्मामध्ये ब्रिटिशांना हरवले आणि ते भारत, ओस्ट्रेलियाच्या सरहद्दीपर्यंत पोहोचले. पर्ल हार्बर वरील हल्ल्याच्या ६ महिन्यानंतर जपानी आरमार कमजोर पडू लागले. याचा फायदा अमेरिकन आरमाराने Battle of Midway मध्ये घेऊन जपानी tankersला नष्ट केले, ज्यामुळे जपानी जहाजांना इंधन पुरवठा कमी पडला. जपानी जहाजे आपल्या आरमारापासून जास्त दूर गेल्यामुळे त्यांना खाद्य व इतर मदत पुरवणे अवघड झाले, परिणामे अनेक जपानी सैनिकांचा उपासमारीने मृत्यू होऊ लागला. जपानी आरमाराला एकापाठोपाठ एक अशी Midway (1942), Philippine Sea (1944) आणि Leyte Gulf (1945) मध्ये हार पत्कारावी लागली. शेवटी August १९४५ मध्ये हिरोशिमा व नागासाकी वरील अणुबांब हल्ल्यांनी जपानला शरणागती पत्करायला मजबूर केले. १९३९ ते १९४५ दरम्यान २१ लाख जपानी सैनिकांना आपला प्राण गमवावा लागला. 7 द्वितीय विश्व युद्धानंतर जपान जपानी साम्राज्य कोलमडल्यानंतर जपान नवीन संविधानासोबत एक प्रजासत्ताक देश बनला. हा काळ अमेरिका व जपान मधील वाढत्या मैत्रीचा होता व या काळात जपान एका आर्थिक महासत्तेच्या रूपातन जगासमोर आला.

Occupation of Japan : जपानवर कोणतीही विदेशी शक्ती ताबा मिळवू शकली नाही. जपानला एक शांतीपूर्ण व प्रजासत्ताक देश बनवण्यासाठी अमेरिकन लोक जपानमध्ये आले. यामुळे जपानमध्ये संपत्ती पुनर्वितरण व सामाजिक सुधारणा झाल्या. स्वतंत्रपणे निवडलेले विधीमंडळ व वयस्क मताधिकारासारख्या राजकीय सुधारणांच्यात समावेश होता. जमीन सुधारण्या अंतर्गत गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांची मालकी देण्यात आली व सशक्त अशा मजदूर संघटना तयार करण्यात आल्या. या सर्व सुधारणा अमेरिकेच्या अप्रत्यक्ष नियंत्रणाद्वारे अंमलात आणल्या गेल्या . जपानी साम्राज्याचा ऱ्हास झाला व जपानने समुद्रावरील मालकी गमावली आणि फक्त स्वतःची बेटे आणि Okinawa वरच त्याचा ताबा राहिला. १९४६ ते १९५४ दरम्यान Shigeru Yoshida (1878-1967) ने जपानच्या पंतप्रधानपदी महत्त्वाची भूमिका बजावली. जपानची जलद पुनर्बांधणी व अमेरिकेशी सहयोग वाढवणे हे त्याचे लक्ष्य होते. त्याने आणलेल्या “Yoshida Doctrine (तत्त्वप्रणाली) चीतीन मुख्य तत्त्वे देशाचा आर्थिक विकास साधणे, आंतर्राष्ट्रिय राजकीय-सैनिकी बाबींमध्ये सहभागी न होणे व अमेरिकन लष्करी तळासाठी तरतुदी करणे ही होती. Yoshida Doctrine ही अत्यंत यशस्वी तत्त्वप्रणाली ठरली. शांती करार : कोरियन युद्धासोबत जपान शीतयुद्धात उतरल्यानंतर जपानला अमेरिकेचा महत्त्वाचा मित्र म्हणून पाहण्यात येऊ लागले. जपानमध्ये अनेक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सुधार करण्यात आले. देशाचे संविधान ३ मे १९४७ रोजी अंमलात आणले गेले. अमेरिका तसेच इतर ४५ मित्रराष्ट्रांनी सप्टेंबर १९५१ मध्ये जपानशी शांती करारावर हस्ताक्षर केले. अमेरिकन शिष्टमंडळाने या कराराला २० मार्च १९५२ मध्ये मंजूरी दिली आणि २८ एप्रिल १९५२ पासून जपान एक सार्वभौमिक राष्ट्र म्हणून समोर आले. करारानुसार अमेरिकेने Sasebo, Okinawa व Yokosuka येथे आपले आरमार उभारले, ज्याचा अंशतः उद्देशजपानला संरक्षणात्मक मदत पुरवणे होता.

शीत युद्ध : १९५५ मध्ये राजनीतिक पक्षांच्या संघटनांतून Liberal Democratic Party (LDP) आणि Social Democratic Party (SDP) या पक्षांचा उदय झाला. १९९० पर्यंत LDP हा सर्वांत मोठाराजनीतिक पक्ष राहिला व त्याने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर अधिक लक्ष्य केंद्रित केले. १९५०-१९८० दरम्यान जपान आर्थिक महासत्तेच्या रूपात जगासमोर आले.

जपान-अमेरिका परस्पर सहयोग करारावरून (Japan-United States Mutual Security Assistance Pact ) १९६० मध्ये जपानमध्ये सर्वांत मोठी आणिबाणीची वेळ आली. LDP पंतप्रधान Eisaku Sato द्वारे नवीन परस्पर सहयोग आणि सुरक्षा करार विधीमंडळात आणला गेला, ज्याला अनेक छोट्या-छोट्या राजनीतीक पक्षांनी विरोध केला. विधीमंडळाद्वारे या कराराला मंजूरी मिळाल्याचा विरोधकांद्वारे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर उतरून निषेध करण्यात आला. मोठे राजनीतीक बदल घडून आले व एका महिन्यात मंत्रीमंडळाने राजीनामा दिला. यानंतर राजनीतिक गोंधळ थांबला. जपानचे अमेरिकेसंबंधात हळुहळू विचारपरिवर्तन होत गेले. तसेच जपानच्या चीनशी संबंधात सुधार होत गेला. १९७२ मध्ये तोक्योचे बीजिंगशी संबंध मजबूत झाले होते. जपान आणि रशिया मधील संबंध काहीसे आपत्तीजनकच राहीले परंतु १९ October १९५६ च्या जपान आणि USSR मधील घोषणापत्रानंतर त्यातही सुधार झाला.

आर्थिक वृद्धी : द्वितीय विश्वयुद्धानंतर जपानी अर्थ्व्यवस्था अनपेक्षित भरभराटीला पोहोचली. कोरियन युद्धात जपान अमेरिकेला साधनसामग्रीचा पुरवठा करणारा सर्वांत मोठा देश होता, परिणामे जपानी अर्थव्यवस्थेला उत्तेजन मिळाले. या काळात जपानी अर्थव्यवस्थेत अतिजलद वाढ झाली, ज्यात उत्पादन क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा होता. पोलाद निर्मिती, कार व Electronics या क्षेत्रांत जपानने विशेष उन्नती केली. सकल घरेलू उत्पाद (GNP), विदेशी व्यापार व जीवनशैली इत्यादी बाबतींत जपानने पश्चिमी राष्ट्रांशी बरोबरी साधली. १९६४ चे तोक्यो Olympic खेळ आणि १९७० च्या Osaka आंतर्राष्ट्रीय प्रदर्शनामुळे याची प्रचिती आली. १९७३ मध्ये OPEC ने तेलाच्या किंमतीत ४ पटीने वाढ केल्याने प्रथमच जपानच्या उच्च आर्थिक वृद्धीत व राजनीतिक स्थिरतेत अडचन निर्माण झाली. दुसरी महत्त्वाची अडचण अतिरिक्त व्यापारी मिळकतीची होती, ज्यामुळे अमेरिकेने जपानवर येनची किंमत वाढवण्याचा व अमेरिकेतून आयातकरण्याचा दबाव बनवला.

शीत युद्धानंतर : शीत युद्धानंतरचा कालखंड Heisei कालखंडाच्या नावाने ओळखला जातो. १९८९ हे जपानच्या इतिहासातील सर्वांत जलद आर्थिक वृद्धीचे वर्ष होते. येनच्या वाढत्या ताकतीमुळे व dollar शी असलेला अदलाबदलीचा अनुकूल भाव यामुळे Bank of Japan ने आपले व्याजदर कमी केले. परिणामे एका वर्षात तोक्योतील मालमत्तेच्या किंमतीत ६० % वाढ झाली. यानंतर जपानी अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, परंतु यामुळे हंगामी व part time (पार्ट-टाइम) नोकऱ्यांमध्ये वाढ झाली. LDPच्या आर्थिक घोटाळ्यांच्या मालिकेमुळे Morihiro Hosokawaच्या नेतृत्वात १९९३ मध्ये गठबंधन सरकार सत्तेवर आले, जे एका वर्षानंतर कोलमडले. १९९६ मध्ये LDP पुन्हा सत्तेवर आले आणि Tomiichi Murayama देशाचे नवे पंतप्रधान बनले. Great Hanshin नावाच्या मोठ्या भूकंपाने १७ जानेवारी १९४५ रोजी Kobe येथे झाला. या भूकंपात ६००० लोक मृत्यू पावले व ४४,००० लोक जखमी झाले. २.५ लाखापेक्षा जास्त घरे नष्ट झाली व ३० अब्ज येनचे नुकसान झाल्याचे वर्तवण्यात आले. २००१ ते २००६ पर्यंत जपानच्या पंतप्रधानपदी असलेल्या Junichiro Koizumiला अर्थव्यवस्थेच्या सुधारकाच्या रूपात ओळखले जाते. त्याने राष्ट्रीय डाक पद्धतीचे खाजगीकरण केले. तसेच त्याने आतंकवादविरोधात जपानच्या Self-Defense Forcesचे १००० सैनिक इराक युद्धानंतर इराकच्या पुनर्बांधणीसाठी पाठवले. निकट वर्तमानात Democratic Party of Japan (DPJ), Social Democratic Party, People's New Party यांचे गठबंधन सत्तेवर असून LDP प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. New Komeito Party, Sōka Gakkai party आणि Japanese Communist Party हे जपानमधील इतर काही राजनीतिक पक्ष आहेत.

११ मार्च २०११ रोजी जपानच्या इतिहासातील सर्वांत मोठा भूकंप Honshūच्या उत्तर-पूर्व भागात झाला. ९ रिश्टर तीव्रतेच्या या भूकंपासोबत त्सुनामीही आली, ज्यामुळे काही nuclear reactors चेमोठ्या प्रमाणात नुकसान झाले. Fukushima Nuclear Plantच्या नुकसानामुळे इतर तीन Nuclear Plantला बंद करावे लागले व अणुकिरणोत्सर्गी पदार्थ बाहेर पडल्यामुळे ही दुर्घटना १९८६ च्या Chernobyl दुर्घटनेनंतरची सर्वांत मोठी ठरली.

[ संदर्भ हवा ] प्रिय विकिसदस्य,

विषयः प्रताधिकार संदर्भात

आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.




आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.

मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.


साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.

आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.

आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.



असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.


आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.


आपले विनीत,

साहाय्य चमू

ता.क.:

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले