Jump to content

जन्मलग्न

पंचांगात रोजचे ग्रह हे सकाळी साडेपाच वाजताचे दिलेले असतात. लग्न सारणी ही एका विशिष्ट गावाची दिलेली असते. (उदा० दाते पंचांगात सोलापूरची). त्यामध्ये लग्नाच्या समाप्तीची वेळ दिलेली असते. आपल्या गावाची लग्न समाप्ति वेळ काढण्यासाठी तिच्यात काही बदल करावा लागतो. लग्न म्हणजे काय? तर पूर्वेकडे बघितल्यावर त्यावेळेस जी रास उगवत असते, ते त्यावेळेस त्या ठिकाणी चालू असणारे लग्न. समजा एखाद्याचा जन्म सकाळी ८ वाजता झाला, तर सकाळी ८ वाजता त्याच्या जन्मगावी जी रास पूर्व क्षितिजावर उगवत असते ते त्या व्यक्तीचे जन्मलग्न असते. जन्मपत्रिकेत पहिल्या घरात जन्मलग्न लिहिलेले असते .