Jump to content

जनुकशास्त्र

जनुकशास्त्र हे जनुक अभ्यासणारे शास्त्र आहे.

यातील संशोधनामुळे सदोष मानवी जनुके हुडकून त्यांच्या जागी काही दुरुस्त्या करता येतात व संभाव्य रोग टाळता येतात. सध्या मानवी प्रतिकारशक्तीस कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांची संकेतावली उलगडण्यासाठी संशोधन केले जाते आहे. जेव्हा पेशीविभाजनाची क्रिया होत असते तेव्हा काही जनुकांची नक्कल करण्यात चुका होतात. त्यामुळे कर्करोग व इतर जीवघेणे रोग होतात. हे रोग ते काही वेळेला केमोथेरपी सारख्या उपचारालाही दाद देत नाहीत.

संशोधन

इंटरनॅशनल कॅन्सर जिनोम कॉन्सोर्टियम ही जनुकशास्त्राची अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेने कर्करोगाच्या २५ हजार जिनोमचा उलगडा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींच्या जिनोममुळे स्वाइन फ्लू व इतर काही रोगांवरील नवीन औषधे तयार होण्याच्या दिशेने या प्रकल्पाचा उपयोग आहे.

इतिहास

जनुकशास्त्र शास्त्राचा इतिहास हा प्रामुख्याने तीन विभागात आढळतो.मेंडेल या शास्त्रज्ञाला जनुकशास्त्रात्राचा युगपुरुष मानले जाते. म्हणूनच जनुकशास्त्र मेंडेल अगोदरचे . मेंडेल नंतरचे व मेंडेलचे जनुकशास्त्र अशा तीन गटात विभागले जाते. मेंडेलचे सर्व प्रयोग ,हे वाटाण्या केलेले आढळतात. वाटाणा वनस्पतीमध्ये सात विविध प्रकारचे गुणधर्म वैविध्य दिसून येते याचा वापर करून जनुक शास्त्र अनुवंशिकता निश्चित करू शकते. मेंडेलचे वेगळेपण, हे त्याने केलेल्या निरीक्षणामुळे दिसून येते. लिखित स्वरूपातील पुरावा हा मेंडेल यांनी सर्वप्रथम दिला==

बाह्य दुवे