Jump to content

जनहित याचिका

जनहित याचिका ही भारतातील नागरिकाने न्यायालयाकडून दाद मागण्यासाठीची योजना किंवा प्रक्रिया आहे.

ही प्रक्रिया भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सतरावे मुख्य न्यायाधीश पी.एन. भगवती यांनी प्रस्थापित केली. न्यायव्यवस्थेला लोकाभिमुख करण्याच्या त्यांच्या अनेक उपाययोजनांपैकी ही एक महत्त्वाची व क्रांतिकारी ठरलेली प्रक्रिया होय.

जनहित याचिका म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक सामाजिक संघटना किंवा शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेली याचिका. न्यायालय त्यावर विशेष विचार करून निर्णय देते. जनहित याचिकेची प्रक्रिया ही इतर सर्व न्यायालयीन कामकाजापेक्षा वेगळी आहे. कोणीही सामान्य नागरिक केवळ एका अर्जाद्वारे अथवा टपाल कार्डद्वारे ही याचिका दाखल करू शकतो.प्रसंगी न्यायालयही काही घटनांमध्ये हस्तक्षेप करून स्वतःअशी याचिका दाखल करू शकते. सध्या अनेक सजग नागरिक व संस्था याचा वापर सामाजिक हितासाठी करत आहेत.

•==जनहित याचिकेचे महत्त्व==

- जनहित याचिकेत समानता, जीवन आणि व्यक्तिमत्त्वाच्या अधिकाराचे विस्तृत वर्णन दिले गेले आहे ज्याची हमी भारतीय घटनेच्या तिसऱ्या भागांतर्गत दिलेली आहे.
:-हे समाज किंवा समाज कल्याणमधील बदलांसाठी प्रभावी साधन म्हणून कार्य करते.
- जनहित याचिकेद्वारे कोणतीही सार्वजनिक किंवा व्यक्ती पीआयएल लागू करून अत्याचार केलेल्या वर्गाच्या वतीने उपाय शोधू शकते.