जनमत चाचणी
निवडणूक जनमत चाचण्या
विवाद
निवडणूक आयोगाकडून जनमत चाचण्यांवरील बंधने
निवडणूक आयोगाने जनमत चाचण्या आणि मतदानोत्तर चाचण्यांवर बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यासंदर्भात काही नवे निकष जारी केले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानापूर्वी 48 तास कोणत्याही प्रकारच्या जनमत अथवा मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येणार नाहीत.[१]
ज्या वेळी मतदान एकापेक्षा जास्त टप्प्यात होतं, तेव्हा सर्व टप्पे होईपर्यंत म्हणजेच शेवटच्या टप्प्यानंतर जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येतील.
प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स किंवा अन्य माध्यमांनी जनमत चाचण्या केल्या असतील तर त्यांना त्याचे निष्कर्ष प्रसारित करताना आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे पाळावीच लागतील. त्यानुसार मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी 48 तास आधी या जनमत चाचण्याचं प्रसारण पूर्ण करावं लागेल. तसंच एग्झिट पोलच्या बाबतीत मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतरच जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येतील.
निवडणूक आयोगाने या सूचना जानेवारी 1998 मध्येच जारी केल्या होत्या, मात्र त्यावेळी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.
जनमत चाचण्यांसंदर्भातला निर्णय निवडणूक आयोगानेच घ्यावा, असे निर्देश दिल्यानंतर आयोगाने या सूचना पुन्हा जारी केल्या आहेत.
संदर्भ
- ^ स्टारमाझा संकेतस्थळ[permanent dead link] 24 Sep 2009 04:48:56 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट